Amol Bawadkar Joining Ajit Pawar NCP In Pune : विधानसभेसाठी चंद्रकांत पाटलांचा विजयासाठी झटलेल्या अमोल बालवडकरांनी भाजपा सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं त्यानंतर भाजपाने माझ्यासोबत दगा फटका केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही. ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली त्यामुळे मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.
भाजपला फटका बसेल
मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं मात्र जे काही झालं यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान आहे माझं नाही.मी राष्ट्रवादीत गेल्याने माझ्यापेक्षा जास्त भाजपाला नुकसान होणार असून, याचा फटका भाजपा बसेल असा इशाराही बालवडकर यांनी दिला आहे.
लहू बालवडकर भाजपचे उमेदवार; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज घडामोडी
प्रभाग क्रमांक नऊ मधून लहू बालवडकर यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरूड विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल बालवडकर यांनी आपण स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे करत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. मोर्चे, बैठकांमधील नाराजी आणि थेट विरोधामुळे हा वाद इतका पेटला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मध्यस्थी करावी लागली होती. मात्र, आता त्याच फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा थेट आरोप बालवडकरांनी केला आहे.
पुण्यात भाजपला जोरदार धक्का; उमेदवारी नाकरलेले बालवडकर हातात घड्याळ बांधाणार #PuneMunicipalElections #BJP @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BalwadkarAmol pic.twitter.com/YIYsMQshLH
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 30, 2025
