Download App

PMC : तापमान वाढणार! महानगरपालिकेकडून पुणेकरांसाठी उष्माघातासंबंधी सूचना जारी

Image Credit: letsupp

PMC : जसा मार्च महिना सुरू झाला. तसं वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या ( PMC ) आरोग्य विभागाने बुधवारी नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाच्या अहवालानुसार पुणे शहरात सध्या कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या श्रेणीत आहे. पारा आणखी वाढण्याच्या शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना खबरदारीचे उपायोजनाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

‘RC 16’ मध्ये राम चरणसोबत, धडक गर्ल जान्हवी कपूर दिसणार मुख्य भूमिकेत, ‘या’ दिवशी येणार भेटीला

त्यामुळे उष्णतेचा त्रास किंवा उष्णतेचे संबंधी आजार होऊ नये. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी काळजी घेतली पाहिजे. असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. कारण उष्माघात ही अत्यंत गंभीर समस्या आहे. जी उष्णतेच्या संपर्कात आल्याने होते. शरीराचे तापमान अनियंत्रित झाल्याने ही समस्या उद्भवते ज्यामध्ये अतिउच्च पातळी गाठल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचाही धोका असतो.

पोस्टर छापायलाही पैसे नाहीत, लढणार कसं?; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं कंबरडं मोडलं

यावर पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी सांगितले की, नागरिकांनी विशेषता दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळावे. स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवावे. हलके तसेच हलक्या रंगाचे, आरामदायी आणि सच्छिद्र, सुती कपडे घालावेत उन्हात बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी शूज यासारख्या गोष्टींचा वापर करावा. आवश्यक नसल्यास मान जास्त असताना बाहेर पडू नये. तसेच अशा प्रकारचे समस्या उद्भवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा. ओआरएस पावडर, घरगुती पेय जसे लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा वापर करा ही पेय शरीराला रिहायड्रेटेड करण्यास मदत करतात.

तसेच हवामान विभागाच्या पुणे विभागाचे विभाग प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, ईशान्य उत्तर प्रदेश आणि पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशाच्या पश्चिम भागात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस कोरडे हवामान राहील. तसेच येत्या काही दिवसात किमान तापमानात किंचित मात्र कमाल तापमान लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

follow us

वेब स्टोरीज