Download App

PMPML…ने सुरु केले पुन्हा ‘इतके’ बस मार्ग…

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) पुणे शहरासह ग्रामीण भागासाघी नव्याने १० बसमार्ग (Bus) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ४ बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे. नवीन १० आणि विस्तारीत ४ असे एकूण १४ बसमार्ग शुक्रवार (दि. ३) पासून प्रवाशी सेवेसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen), विद्यार्थी (Student), नोकरदार (Worker), महिला (Women) वर्ग व शेतकरी (Farmer) यांना याचा लाभ होणार आहे.

…असे असणार नवीन १० बसमार्ग
१) उरूळी काचंन ते नांदुर गांव, २) गुजरात कॉलनी ते पुणे स्टेशन, ३) आळंदी ते खराडी, ४) येवलेवाडी ते पुणे स्टेशन, ५) हडपसर ते पुणे स्टेशन, ६) शेवाळवाडी ते न. ता. वाडी, ७) आळंदी ते तळेगाव, ८) घरकुल वसाहत ते पिंपरी गाव, ९) भोसरी ते चिखली आणि १०) भोसरी ते कोथरूड डेपो.

…असे असणार विस्तारीत ४ बसमार्ग
१) हडपसर ते वाघोली
२) भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा
३) राजस सोसायटी ते शिवाजीनगर
४) निगडी ते ग्रीनबेस कंपनी

Tags

follow us