पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने वडाचीवाडी (ता. हवेली) येथील १३४.७९ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक (Town Planning) योजना मंजुरीसाठी शासनाकडे (Government) सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (Ringroad) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना पैकी वडाचीवाडी नगर रचना (Town Planning) योजनेतील सर्व जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणी दिल्यानंतर या योजनेसाठी शासननियुक्त लवाद रवींद्र जायभाये या सहाय्यक संचालक नगर रचना दर्जाच्या अधिकाऱ्याने लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे नुकतीच सादर केली आहे, असे पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
या योजनेचे कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी २६ जाने ते १ फेब्रु २०२३ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
सुमारे १७०० खातेदार शेतकरी यांची १३१.८४ हेक्टर क्षेत्र व २.९५ हेक्टर नाल्याचे क्षेत्राचा या नगर रचना योजनेत समावेश आहे. त्यामध्ये ५० टक्के क्षेत्राचे १४८ विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देनेत आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी ११.७२ हेक्टर क्षेत्राचे ९ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या योजना क्षेत्रात सुमारे १९.२२ टक्के क्षेत्र (२५.३३ हे.आर.) रिंगरोड (९.८३ हे.) व अंतर्गत रस्ते(१५.५० हे.), मैदानांसाठी ७ भूखंड, बगीचा साठी ११ भूखंड, बालोद्यानासाठी ८ भूखंड, ग्रीन बेल्ट साठी २ भूखंड व २ खुल्या जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
या शिवाय नागरी सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, शॉपिंग सेंटर, यासाठी देखील भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या नगर रचना योजनेतून ६५ मी रुंदीच्या १.५ कि मी रस्तासाठी लागणारे सुमारे ९.८३ हे.आर क्षेत्र ताब्यात येईल.