Download App

Kasba Bypoll : बापटांना पाहून पर्रिकर आठवले, प्रचार करणार नाही; आनंद दवे यांची नाराजी

Kasba Bypoll : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) मतदारसंघात चुरस वाढली आहे. सध्याच्या घडामोडींकडे पाहिले तर ही जागा भाजपसाठी (BJP) अडचणीत आल्याचे सांगितले जात असतानाच भाजपने आजारी असतानाही गिरीश बापट (Girish Bapat) यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरविले. त्यामुळे मी आज वैयक्तिक प्रचार करणार नाही, असे हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी सांगितले. दवे हे या मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.यावेळी भाजपने टिळक कुटंबियात कुणाला उमेदवारी दिली नाही तर हेमंत रासने यांना संधी दिली आहे.यामुळेही नाराजीचा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने भाजपने आजारी अवस्थेत असतानाही बापट यांना प्रचारात उतरविले.बापट यांनी नाकात नळी लावून आणि व्हीलचेअरवर बसून पक्षाचा प्रचार केला. भाजपच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली.त्यानंतर दवे यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की बापट साहेबांना त्रास होत होता, पण यातना आम्हाला जाणवत होता.त्यांना पाहू मनोहर पर्रिकर आठवले. याचा मानसिक त्रास होत असल्याने मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नाही, असे दवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा : मविआकडून आरपारची लढाई; खुद्द शरद पवार उतरणार मैदानात

आजपर्यंत कसब्यात ब्राह्मणच आमदार निवडून आले आहेत.बापट यांनी सहा वेळा या मकदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे.पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी प्रचारात येऊ शकत नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र नाराजीमुळे अडचण वाढण्याचा अंदाज आल्याने भाजपने बापट यांना प्रचार करण्याची गळ घातली.त्यानंतर आजारी असतानाही बापट यांनी प्रचार केला. दरम्यान, येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Tags

follow us