Sunny World : सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

Sunny World : सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस

Sunny Nimhan

Sunny Nimhan

Sunny Nimhan : सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि सनीज वर्ल्ड यांच्या वतीने संयुक्तपणे पुढाकार घेण्यात आला आहे. एसीपी सत्यजीत आदमाने आणि वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राकेश गुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

नगरसेवक सनी निम्हण (Sunny Nimhan) यांच्या पुढाकाराने सनीज वर्ल्डच्या (Sunny’s World) वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत सूस ब्रिज ते सनीज वर्ल्ड रस्त्यादरम्यान वाहतूक व्यवस्थापनासाठी चार वाहतूक स्वयंसेवक (वॉर्डन) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे स्वयंसेवक वाहतूक कोंडीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासोबतच वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करत आहेत.

सूस-नांदे रस्त्यावर विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करणे, वाहनांची सुरक्षित आणि शिस्तबद्ध हालचाल सुनिश्चित करणे तसेच नागरिकांना अधिक सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमाबद्दल पोलिसांच्या वतीने सनीज वर्ल्ड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागरिक, व्यावसायिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, सनीज वर्ल्डने सीएसआरच्या माध्यमातून घेतलेला हा पुढाकार त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स निर्मित ‘तुझ्या आयला’मध्ये सुजय डहाके यांनी मांडला अनोखा खेळ..

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमामुळे सूस-नांदे परिसरातील वाहतूक नियंत्रणास मदत होत असून, नागरिकांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्यास हातभार लागत आहे.

Exit mobile version