फटाकेबाज सायलेंसरवर पोलिसांचा बुलडोजर; पुण्यातला कर्णकर्कश आवाज बंद…

पुणे शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलली असून तब्बल 2800 वाहनांवर केली कारवाई.

Untitle (10)

Untitle (10)

Pune News : पुण्यात शहर वाहतूक शाखेकडून आज एक मोठी कारवाई करण्यात आलीयं. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तब्बल 2800 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली असून वाहनाचं सायलेंसर जप्त करुन त्यावर बुलडोझर फिरवलायं. एवढंच नाही तर या वाहनचालकांकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुण्यात वाहनांचा येत असलेला हा कर्णकर्कश आवाज कायमचा बंद झाला असल्याचं बोललं जात आहे.

नुकत्याच नगरसेविका झालेल्या आदिवासी महिलेला भाजपकडून राज्यसभेवर संधी; कोण आहेत मायाताई इवनाते?

पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.

सोसायटीचा निर्धार आणि सरकारची साथ, वाकडमध्ये 120 किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प, महिन्याला होणार 2.30 लाखांची बचत

या कारवाईबद्दल बोलताना पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, पुण्यातील जवळपास 2822 कर्णकर्कश आवाजाच्या वाहनांवर कारवाई करण्यात आलीयं. यासंदर्भात लोकांनी तक्रारी केल्यानंतर शहर वाहतूक पोलिस शाखेच्यावतीने मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आलीयं. यापुढे जे लोकं कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर बसवतील त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलायं.

दरम्यान, शहराच्या विविध भागांमध्ये ‘मॉडिफाईड’ सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. परिणामी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि निवासी परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः हा कर्णकर्कश आवाज रात्रीच्या वेळी अधिक त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अजब कारभार, धुलिवंदनला मुलींना वसतिगृहाबाहेर नो ऐन्ट्री

Exit mobile version