Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातीत ललित कला केंद्र परिसरात तोडफोड प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती न दिल्याने पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक सचिन शंकर गाडेकर असं या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, जातीवाचक शिवीगाळ केल्यानं ॲट्रॉसिटी दाखल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणवर आधारित नाटक सादर केले. नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील शब्द वापरण्यात आले होते, असा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले. त्यावेळी ललित कला केंद्राच्या आवारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
मृत्यूची खोटी बातमी पूनम पांडेला भोवणार! कायदेशीर कारवाईची सत्यजीत तांबेची मागणी
त्यानंतर शनिवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी ललित कला केंद्राच्या आवरात घोषणाबाजी करून शाईफेक केली. कार्यकर्त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्या, तसेच कुंडया फोडून नुकसान केले. त्यावेळी ललित कला केंद्रात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर बंदोबस्तास होते.
धक्कादायक! मृत्यूच्या बातम्यांदरम्यान Poonam Pandey स्वतः कॅमेऱ्यासमोर; मी जिवंत, हे सर्व केलं कारण…
ललित कला केंद्राच्या आवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. तेथे शीघ्र कृती दलाला (रॅपिड ॲक्शन फोर्स) बोलाविले नाही, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती त्वरीत कळविली नाही. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्तव्यात कसुरी केली. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन गाडेकर यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.