Download App

भाजपला मीच छूप्या पद्धतीने नडू शकतो; पुण्यातील मिशन टायगर अडकलं अटी शर्तींच्या गर्तेत

अशातच मागील आठवड्यामध्ये विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना संपर्क केला आहे. या संपर्कादरम्यान बाबर यांना पक्षाचे

  • Written By: Last Updated:

Mission Tiger in Pune : मिशन टायगरला पुण्यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं ओळखून पुण्यातले शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असून शहराध्यक्ष पदाची अट ठेवल्याची माहिती समोर आली आहे. (Tiger) शहरात पक्ष वाढवायचा असेल तर भाजपसोबत छुपी लढाई करावी लागेल आणि ती मीच करू शकतो, अस हा माजी आमदार शिंदे सेनेच्या मुंबईतील काही वरिष्ठ नेत्यांना बोलल्याची माहिती मुंबईत काही नेत्यांसोबत तीन ते चार बैठका या माजी आमदाराच्या झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिंदेंच्या सेनेकडून कोकणातील उदय सामंत मैदानात उतरले असताना विरोधात ठाकरेंनी देखील आपला कोकणातील हुकमी एक्का बाहेर काढला आहे. ठाकरे सेनेला पक्षाला रामराम करणाऱ्या नाराज नेत्यांना थोपवण्याचं काम माजी खासदार विनायक राऊत यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिशन टायगर! पुण्यातील बड्या नेत्याचं बंड रोखण्यासाठी ठाकरेंचा हुकमी एक्का मैदानात

गेल्या काही दिवसापासून पुण्यातील ठाकरेंच्या सेनेला गळती लागली असल्याचे पहिला मिळत आहे. ठाकरे सेनेत असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणखीन दोन ठाकरेंच्या गटामध्ये असलेले माजी आमदार शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. माजी आमदार महादेव बाबर देखील लवकरच पक्षाला रामराम करून देऊन शिंदे यांच्या सेनेमध्ये पक्ष प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

अशातच मागील आठवड्यामध्ये विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना संपर्क केला आहे. या संपर्कादरम्यान बाबर यांना पक्षाचे काम सुरू ठेवण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात आले असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कामाला लागा अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाऊ नका, अशी गळ घालण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुमची आठवण काढत असून त्यांनी भेटीला बोलावलं असल्याचा निरोप देखील विनायक राऊत यांनी बाबर यांना दिला असल्याचं सांगितलं जात आहे. आता मिशन टायगर रोखण्यासाठी ठाकरेंनी देखील विनायक राऊतांच्या नेतृत्वात मिशन सुरू केलं असल्याचं आता समोर आले आहे. त्यामुळे याबाबतीत कोकणातला कोणता नेता वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us