मिशन टायगर! पुण्यातील बड्या नेत्याचं बंड रोखण्यासाठी ठाकरेंचा हुकमी ‘एक्का’ मैदानात

पुणे : मिशन टायगर अंतर्गत पुण्यातील काही नेते एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून, यात ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याच्या नावाचीही चर्चा आहे. पण, या नेत्याचे बंड थंड शमवण्यासाठी ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचा हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे. त्यामुळे आता पुण्यातील ठाकरेंच्या बड्या नेत्याचे बंड थंड होते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Vinayak Raut Called Mahadeo Babar)
पुण्यात राजकीय भूंकप? गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरेंच्या ‘वाघिणी’ शिंदेंच्या संपर्कात
ठाकरेंचा कोणता नेता टार्गेटवर
आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात ठाकरे गटातील नेत्यांना मिशन टायगर अंतर्गत पक्षात घेण्याच्या हालाचाली सुरू असून, यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadeo Babar) यांचे नाव चर्चेत आहे. पण, आता याच बाबर यांना शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी कोकणातील हुकमी एक्का बाहेर काढत नाराज नेत्यांना थांबवण्याची जबाबदारी विनायक राऊत यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका; पक्षाचं काम जोमाने करा
ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांना ठाकरेंनी विनायक राऊतांच्या माध्यमातून अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका पक्षाचे काम जोमाने करा असा निरोपदेखील फोनवरून धाडला आहे.
भाजपच्या राजकारणामुळे मारणेचा बळी?; नाव न घेता रवींद्र धंगेकरांनी सांगितल मोहोळांचं राजकीय गणित
साहेब तुमची आठवण काढत आहे
जोमाने काम करण्यास सांगण्याबरोबरच विनायक राऊतांनी बाबर यांना उद्धव साहेब तुमची आठवण काढत असल्याचेही सांगितले. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
अजित दादा अन् रवी भाऊचे संबंध चांगले, राष्ट्रवादीचा विचार कर; रूपाली ठोंबरेंची धंगेकरांना ऑफर
धंगेकरही शिवसेनेत जाण्याच्या चर्चा
दुसरीकडे, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी मध्यंतरी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा रंगली होती. ज्यात धंगेकर यांनी गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो ठेवला होता. त्यांच्या या स्टेटसनंतर धंगेकर लवकरच काँग्रेसचा हात सोडून शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगूू लागल्या होत्या. पण, मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे.