खासदार विनायक राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका

खासदार विनायक राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका

Vinayak Raut On Eknath shinde: नागपूर (Nagpur)येथील वज्रमूठ सभेआधी विनायक राऊत (Vinayak Raut)यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) दुसरी महासभा 16 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता एनआयटी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी उच्चांकी गर्दी होणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.याचवेळी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर(Eknath shinde) जोरदार निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे अटकेच्या भितीने मातोश्रीवर येऊन रडले ; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

खासदार राऊत म्हणाले की, या सभेची जबाबदारी सुनील केदार यांच्यावर आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेतेही या सभेच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात दुर्देवाने काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

आता स्वतःच्या असंतुष्ट आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकत नसल्याचं पाहून त्यांच्या मनात बंडखोरीची भावना निर्माण झाली. त्याला कुठेतरी शांत करण्यासाठी ते अयोध्येला गेले. श्रीरामांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या मनात काही बदल होईल असं मुख्यमंत्र्यांना वाटलं. अयोध्येहून परत आल्यानंतर मुख्यंत्र्यांनी नाशिकमधील काही ठिकाणी भेटी दिल्या. पण शेतकऱ्यांना आत्तापर्यंत काहीच मदत मिळाली नाही.

लोकांना फसवणारं, गंडवणारं असं विश्वासघातरी सरकार राज्यात आलं आहे, त्यामुळे सर्वसामान्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला आधाराचा शब्द देण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्यभरात सभा सुरु आहेत. त्यातच आता काहींचा पोटशूळ उठला आहे. नागपूरमध्येच महाविकास आघाडीची सभा होणार असल्यानं या सभेला अडचण कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण त्यासाठीची सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ही सभा होणार म्हणजे होणारचं असं ठणकावून सांगितलं आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर विनायक राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सत्तेची खुर्ची सोडून आणि वर्षाचा त्याग करुन आपल्या घरात जाणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उध्दव ठाकरे आहेत. उध्दव ठाकरेंनी मुख्यमत्रिपदाच्या खुर्चीचा त्याग केलेला आहे. त्यांची खुर्ची गेलेली नाही. त्यामुळे चिडचिड त्या गोष्टीची नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube