Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता गावकीचं राजकारण तापणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. फक्त याच निवडणुका नाही तर दीड वर्षांनंतर होणाऱ्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची चाचपणी सुरू झाली आहे. या निवडणुकांना अजून बार काळ शिल्लक आहे. मात्र आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. उमेदवार कोण असतील याची माहिती नाही मात्र शिंदे गटाचे मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांचं नाव समोर आलं आह. याला निमित्त ठरलं ते पावसाळी अधिवेशना दरम्यान शिक्षकांनी आझाद मैदानात केलेलं आंदोलन. या आंदोलनात सरकार आणि शिक्षक यांच्यातील संवादाचं काम चिवटे यांनी समर्थपणे सांभाळलं.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दीड वर्ष बाकी आहे. तरीही या निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यांतील इच्छुक प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. या निवडणुकीतही जागा काँग्रेसलाच मिळेल अशी दाट शक्यता आहे. महायुतीत ही जागा भाजपाच्या वाट्याला येत आहे. याआधीच्या निवडणुकीत भाजपने येथे उमेदवार दिला होता. मात्र पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे जयंत तासगावकर विजयी झाले होते. त्यांनी भाजप आणि अपक्ष उमेदवाराचा पराभव केला होता.
कायदा-बियदा काय सांगू नको, त्या मुलाला वाचवायचं आहे : बाबर यांची आठवण सांगत मंगेश चिवटे भावूक
जागावाटपात भाजप ही जागा शिंदे गटाला देईल याची सूतराम शक्यता नाही. तरी देखील शिंदे गटाकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. शिंदे गट या मतदारसंघावर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. मंगेश चिवटे पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहे.जागावाटपात महायुतीत रस्सीखेच होणार हे अटळ दिसत आहे. त्यामुळे ही जागा कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जयंत तासगावकर, विजयसिंह माने, दत्तात्रय सावंत आणि मंगेश चिवटे आमदार होण्याच्या यादीत बसले आहेत. या सगळ्यांनीच तयारी सुरू केली आहे.
मंगेश चिवटे एकनाथ शिंदे शिवसेनेतील तरुण नेते आहेत. शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जातं. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचं मूळ गाव. त्यांनी पत्रकारितेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर राजकारणात प्रवेश झाला. शिवसेना अखंड असताना त्यांच्या पुढाकारातूनच शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापना झाली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या उभारणीची संकल्पना देखील मंगेश चिवटे यांनीच मांडली होती. मंगेश चिवटे सध्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणार, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान