“कायदा-बियदा काय सांगू नको, त्या मुलाला वाचवायचं आहे” : बाबर यांची आठवण सांगत मंगेश चिवटे भावूक

“कायदा-बियदा काय सांगू नको, त्या मुलाला वाचवायचं आहे” : बाबर यांची आठवण सांगत मंगेश चिवटे भावूक

विटा : शिवसेना आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज (31 जानेवारी) निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडून आले होते. काल (30 जानेवारी) अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तपासणी केली असता न्यूमोनियाचे निदान झाले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी सांगलीतील उश:काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, त्यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांनीही चार दिवसांपूर्वीची मतदारसंघातील एका मुलाला मदत करण्यासाठी त्यांच्या आलेल्या फोनची आठवण सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Tributes were paid to Anil Babar by recalling the call he received four days ago to help a boy in the constituency.)

मंगेश चिवटे यांची अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली : 

भावपूर्व श्रद्धांजली…!! खरं तर आज सकाळी 11 वाजता, विशेष Air Ambulance ने मा. श्री. अनिल भाऊ बाबर साहेब यांस मुंबईत अत्याधुनिक उपचारासाठी आणण्याचे नियोजन होते, पण नियतीने घात केला…!! कालचा संपूर्ण दिवस राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब श्री. अनिल भाऊ बाबर यांच्या तब्बेतीची चौकशी करत होते, श्री. अनिल भाऊ यांचे चिरंजीव सुहासजी बाबर यांच्याशी दूरध्वनीवरून सतत संपर्कात होते..!!!

काल रात्री उशिरा मुख्यमंत्री महोदय यांनी मला, सकाळी लिलावती हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोच, बेड व्यवस्था आणि इतर अनुषंगिक अरेंजमेंट करण्याच्या अनुषंगाने देखील सूचना केल्या होत्या..!! पण आता काही वेळापूर्वीच उश:काल हॉस्पिटलचे डॉक्टर संजय कोग्रेकर सर यांनी श्री. अनिल भाऊ आपल्याला सोडून गेल्याची दिली आणि काळजात चरर झालं…!! आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची जाणीव झाली.

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फक्त 4 दिवस आधी श्री अनिल भाऊ यांच्या समवेत फोनवरून संवाद झाला होता, त्यांनी आटपाडी मतदारसंघातील एक लहान मुलावर बॉन marrow ट्रान्सप्लांट रूग्ण शस्त्रक्रिया साठी तामिळनाडू येथे admit असून आपल्याला कशी मदत पाठविता येईल यासाठी विचारणा केली, नव्हे तर मला आदेशच दिले होते की कायदा बियदा मला काही सांगू नका, हवं तर मी मुख्यमंत्री महोदय यांची विशेष बाब सही घेतो पण या लहान मुलाला वाचवायच आहे अशी भावनिक साद घातली होती…!!

प्रथम आई स्व शोभा काकी आणि आज स्व अनिल भाऊ एक – एक वर्ष अंतराने आई आणि वडील गमावनाऱ्या मुलांनी हे दुःख कसं पचवायचं…?? मुलगा श्री सुहास दादा आणि श्री अमोल दादा यांस ईश्वर हे दुःख पचविण्याची ताकद देवोत…

आदरणीय भाऊं गेले असताना आजची मंत्रिमंडळ कशी होऊ शकेल?? या दुःखद घटनेमुळे आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतलेला आहे.

Budget 2024 : ‘विरोधकांना पश्चातापाची संधी, आत्मपरिक्षण करा’; बजेटआधी PM मोदींकडून कानउघाडणी

खानापूर-आटपाडी मतदारसंघातील आमदार आणि विधानसभेतील सदस्य मा श्री अनिल ( भाऊ ) बाबर साहेब (७४) यांचं अकस्मात निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! या कठीण प्रसंगी आम्ही सर्व श्री अनिल भाऊ बाबर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

स्व शोभा काकी यांच्या जयंतीनिमित्त गेल्यावर्षी विटा येथे आयोजित सर्वात मोठ्या महाआरोग्य शिबिराची एक आठवण..!!!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज