Download App

Prakash Ambedkar मोदी-शाहांना विचारा : टू जी घोट्याळातील आरोपी निर्दोष कसे?

  • Written By: Last Updated:

पुणे : या देशात २०१४ पूर्वी भाजपचे (BJP) नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा झाला म्हणून आरोप केले होते. काँग्रेस सरकार विरोधात या आरोपांची संपूर्ण देशात राळ उठवून दिली. काँग्रेसला बदनाम केले. आणि सत्तेत आले. मग ज्या कारणाने तुम्ही सत्तेत आला. त्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्वच आरोपी निर्दोष कसे सुटले. सर्वोच्च न्यायालय जर आपल्या निकाल पत्रात असा काही घोटाळा झाला असेल म्हणत असेल तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी खोटे आरोप केले होते. याबद्दल खुलासा करून संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पुण्यात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या गोष्टीवरून या देशात भ्रष्टाचार झाला म्हणून २०१३ पासून नरेंद्र मोदी-अमित शाह यांनी दिंडोरा पिटला. पुढे जाऊन याप्रकरणात काही लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर २०१४ ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. मात्र, त्यानंतर दोन वर्षात या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्वच आरोपीना निर्दोष सोडण्यात आले. विशेष बाब म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पत्र तपासून पहा. सर्वोच्च न्यायालयाने असा काही घोटाळा झाला नाही, असे म्हणत सर्वच आरोपीना निर्दोष सोडले.

हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं…

मग एवढ्या मोठ्या प्रमाणात खोटा प्रचार केला गेला. त्याबाबत या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना जाब विचारायला हवा. त्यांनी या देशाला खरं-खोटं काय आहे ते सांगायला हवे. तरच या देशातील लोकं खरं-खोटं काय आहे ते ठरवतील आणि जाब विचारतील, असे देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Tags

follow us