Download App

तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगली, चार राज्यांच्या निकालानंतर काहीही घडू शकते : आंबेडकरांचा दावा

पुणे : राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Prakash Ambedkar has claimed that riots may happen in the state after December 3)

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी मागेही म्हणालो होतो की राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय कोणत्याही पद्धतीने सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत. पक्षाच्यावतीने मी चार महिन्यांपूर्वीच सांगितले होते की चार राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर काहीही घडेल,अशी परिस्थिती आहे. दुर्देवाने एका बाजूला इथे असलेल्या मुस्लिम समाजाला आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे.

“ओबीसींच्या लढ्याचा जनक अन् भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मीच”

ज्यांचा ओबीसी लढ्याशी संबंध नाही अशांनी हा लढा हातात घेतला असून दंगली कशा भडकतील यासाठी वक्तव्ये करणे सुरु आहे. यासाठी ओबीसींनी सतर्क रहावे. यापूर्वीच मी मुस्लिम समाजाला म्हंटलेले आहे की तुम्ही मागील नऊ वर्षांपासून अत्याचार सहन केला आहे, आता लोकसभा निवडणुकांना अवघे चार महिने बाकी आहेत. या चार महिन्यांत जो अत्याचार होईल तो सहन करा. कारण नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाही दावा आंबेडकर यांनी केला.

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी देशात सुरू असलेल्या घडामोडींवरही भाष्य केले. ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी जो लढा सुरू त्याची फळे आपण चाखत आहे. सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. आज देशात हिंदू असूनही देशाला पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या अशी मागणी होत आहे.  आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषदने जरी म्हटले नसेल तरी, फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्याने संविधान बदलणार नाही. पण जोपर्यत आरआरएस प्रमुख मोहन भागवत जोपर्यंत असं वक्तव्य करत नाही तोवर आम्ही मान्य करणार नसल्याचेही यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Prithviraj Chavan : ..म्हणून राष्ट्रवादीनं आमचं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

दिल्लीतील महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणात तुरूंगवास भोगलेल्या छगन भुजबळ यांना ना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयावर पलटवार मीच केला. मी जर त्यावेळच्या न्यायाधीशांना शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ यांना जामीन मिळाला नसता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर न्यायाधीश वागत नसतील तर केस होऊ शकते, असे मी म्हंटले त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल असेही आंबेडकर म्हणाले.

follow us