Download App

Prakash Ambedkar यांना ‘वंचित’च्या कार्यकारणीकडूनच ‘धक्का’

  • Written By: Last Updated:

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bypoll) तोंडावर वंचित बहुजन विकास (VBA) आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे (Devendra Tayde) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणींने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना जबर धक्का दिला आहे. संपूर्ण कार्यकारिणींने नाना काटे (Nana Kate) यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार करावे लागेल. त्यामुळे आपण वंचितमधून बाहेर पडत आहे. तसेच ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी’ टीम बनल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत तायडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह चिंचवड विधानसभा निरीक्षक सुनील आण्णा शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रदेश युवक चे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मराठवाडा विकास संस्थेचे अरुण पवार, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

भाजपच्या काळात देशातील वंचितांच्या शोषणाची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे वंचित घटकाच्या संरक्षणासाठी भाजपक्षाला मदत करणारी कृती टाळायला हवी. कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, असल्याचे तायडे यांनी म्हटले आहे. वंचित हा पक्ष भाजपाची बी टीम बनल्याचे सांगत तायडे म्हणाले, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी समविचारी असणाऱ्या महाविकास आघाडीसोबत असणे आवश्यक असल्याचे सर्वच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपल्यातील मतांची विभागणी ही भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरत आहे.

पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळे एकाही वंचिताचे मत दुसरीकडे जाणार नाही. पक्ष कोणासोबतही असला तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि आम्ही नाना काटे यांना एकगठ्ठा मतदान करून विजयी करणार आहोत. बहुजन, वंचित जनतेनेही विचार करून लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, असे तायडे यांनी यावेळी म्हटले आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेतही फूट
शहरात बाळसे धऱण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले  असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील अभिषेक दांगट यांनी नाना काटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपला सत्तेतून हद्दपार करुन नाना काटे यांना मताधिक्य मिळवून देऊ, असे दांगट यांनी सांगितले.

Tags

follow us