Download App

येरवडा तुरुंगातून कुख्यात गुंड पळाला; ललित पाटील प्रकरणी तोंड पोळलेल्या पोलिसांची पुन्हा नाचक्की

पुणे : ललित पाटील प्रकणात तोंड पोळलेल्या येरवडा कारागृह प्रशासनाच्या डोळ्याखालून एक कैदी पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. आशिष जाधव असे या कैद्याचे नाव असून तो कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. कैद्यांच्या शिरगणतीवेळी हा प्रकार उघडकीस आला. हा कैदी नेमका कसा पळाला याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. (Prisoner Aashish Jadhav escapes from Yerwada Jail)

दोन महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहात कैदी असलेला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्यानंतर ससून रुग्णालय आणि येरवडा कारागृह प्रशासनाची मोठी नाचक्की झाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली होती. या प्रकरणात मोठ्या संख्येने पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आशिष जाधव हा कैदी कारागृहातून पळून गेला आहे.

यापूर्वी कोरोनामध्येही खुल्या कारागृहातून दोन ते तीन महिन्यांच्या अंतरात नऊ कैद्यांनी पळ काढला होता. यात मोक्का आणि जन्मठेपेसारख्या गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश होता. मात्र यातील फरार झालेल्या कैद्यांपैकी एका कैद्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पिंपळे सौदागर इथून अटक केली होती.

Tags

follow us