Download App

LetsUpp Exclusive : शेअर मार्केटच्या नावाखाली पुण्यातील ‘विशाल फटे’चा गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा

Pune Share Market Fraud  :  पुण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरातील एका संस्थेने केला आहे. हा संस्थाचालक फरार झाल्याने अनेक गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अनेक बड्या नेत्यांनी, गँगस्टरनी याच्याकडे गुंतवणूक केलेली असल्याचे समजते. पण खरा फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसणार आहे. हा संस्थाचालक फरार झाल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी बाणेर रस्त्यावरील कार्यालयात मोठी गर्दी केली होती व अनेक जण हातबल झाले होते.

बार्शी येथील विशाल फटे याने असाच प्रकार करून शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील नितीन नरके यांनी देखील शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे नावाखाली अनेकांना बुडविले होते तसाच प्रकार बाणेर येथे घडला आहे.

अवकाळ्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

या  कथित शेअर मार्केट दलालाच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर महिना दहा टक्के या दराने परतावा देण्याच आश्वासन गुंतवणूकदारांना देण्यात आले होते. त्यासाठी किमान गुंतवणूक एक लाख रुपयांची करणे अपेक्षित होते. या परताव्याचा दर काही दिवसांपूर्वी पाच टक्के करण्यात आला आणि वीस महिन्यात गुंतवणूक दुप्पट करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच मूळ रकमेचा धनादेशही कंपनीच्या वतीने सुरक्षितता म्हणून दिला जाईल अशी ग्वाही गुंतवणूकदारांना देण्यात आली होती.

उदयनराजेंचे नाव घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्याने अजित पवारांना भरला ‘दम’

दर महिन्याला हा परतावा हमखास मिळेल असे सांगण्यात आले होते. त्या दृष्टीने गेले काही दिवस काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला दहा टक्क्याने आणि नंतर पाच टक्क्यांनी प्रति महिना परतावा मिळाला एवढे हमखास उत्पन्न मिळत असल्याने अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. आज मात्र कार्यालय बंद असल्याचे पाहून गुंतवणूकदारांना धडकी भरली आणि त्यानंतर ही वार्ता सर्वत्र पोहोचली. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणी धाव घेतलेली नाही.

Tags

follow us