अवकाळ्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले

मराठवाड्यात गारांचापाऊस झाला. शेतीमध्ये गारांचा ढीग पाहायला मिळाला.

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.

अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याला बसला, या दोनच जिल्ह्यातील जवळपास 30 ते 35 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मागील महिन्यात अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, त्यात आता हे दुसरं संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत.

या पाऊसाचा सर्वाधिक फटका गहू, बाजरी, कांदा, द्राक्ष, आंबा या पिकांना बसला, राजभरातील 1 लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे.
