Download App

पुणे भाजपामधील चुरस थांबेना; आता राजेश पांडेही ‘जाकीट’ चढवून तयार

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

पुणे : भाजपचे खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवार पोटनिवडणुक लागेल की नाही याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, असे असतानादेखील पोट निवडणुकीसाठी म्हणा किंवा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खासदार होण्यासाठी पुण्यातील इच्छूकांची यादी वाढताना दिसून येत आहे. (Pune BJP Candidate For Loksabha Election 2024)

साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्तीची घोषणा, कुस्ती महासंघाच्या निवडणुकीनंतर मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून यासाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची नावे चर्चेत होती. त्यात भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांचे निकटवर्तीय राजेश पांडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे पुण्याच्या खासदारीकीसाठी भाजपमधील इच्छूकांची यादी वाढतानाच दिसत असून, यात पक्षाकडून नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वंजारी समाजाचा क्रांतीकारी निर्णय : कालबाह्य ‘वाढीभाऊ’ पद्धत रद्द, 60 आडनावांमध्ये जुळणार विवाह

बापटांच्या घरात तिकिट दिल्यास होऊ शकतो फायदा

आजच्या घडीला जर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेतली तर, नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, दुसरीकडे बापट यांच्या सूनबाई स्वरदा (Swarda Bapat) यांना राजकारणाची जाण आहे. त्यांना तिकीट दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असा विश्वास राजकीय जाणकांरांना आहे. तर, दुसरीकडे स्वरदा या पुण्यात नवीन आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी अन्य नावांचाही विचार पक्षाकडून केला जाऊ शकतो अशी दुसरी शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत.

स्पर्धेत यंग ब्रिग्रेड नावांचीही चर्चा

दुसरीकडे, खासदारकीसाठी भाजपमधून ज्याप्रमाणे दांडगा अनुभव असलेल्या सुनील देवधर (Sunil Deodhar) आणि संजय काकडे यांच्या नावांची चर्चा आहे. त्याच पद्धतीने दुसरीकडे शहरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेले दोन यंग ब्रिगेड म्हणजेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावांचीदेखील जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. यात आता भर पडली आहे ती संजय पांडे यांच्या नावाची. चर्चेत असलेल्या नावांमध्ये मुरलीधर मोहोळ हे तरूण आणि लोकप्रिय असे व्यक्तीमत्व आहे. पुणे महापालिकेत महापौर म्हणून काम करताना त्यांची कामसू महापौर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याशिवाय सध्या ते भाजपचे सरचिटणीस पदाची जबाबदारी संभाळत आहे. तसेच, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

तर, दुसरीकडे मध्यंतरी पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर लागले होते. त्यावर त्यांनी हे पोस्टर कुणी लावले याबाबत कल्पना नसल्याचे सांगत अधिक स्पष्टीकरण देणे टाळले होते. प्रत्येक पक्षामध्ये उमेदवाराची स्पर्धा नक्की असावी. आमच्या पक्षात 4, 5, 6 उमेदवार असतील तर, चांगलचं आहे. पण अखेरीस पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करायचा हे आमचे तत्व आहे. कमळ हाच आमचा उमेदवार आहे. मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपणदेखील निश्चित निवडणूक लढवू, असे सूचक विधानही मुळीक यांनी केले होते.

Letsupp Special : ‘दाऊद इब्राहिम’ मुंबईतून पळून जाण्याचे एक कारण ‘खमका मराठी अधिकारी’ होता…

संघाच्या जवळचे सुनील देवधरही चर्चेत

मोहोळ, काकडे आणि मुळीक यांची नावे मागे टाकत अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचेही नाव चर्चेत आले. पुण्यात संघाला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे देवधर यांना उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

राजेश पांडेचेही खासदारकीच्या शर्यतीत नाव

आगामी काळात पोट निवडणूक झाल्यास किंवा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून मोहोळ, मुळीक, काकडे आणि देवधर यांची नावे चर्चेत असतानाच आता पुणे ग्रामीण भाजपचे प्रभारी राजेश पांडे यांचे नाव चर्चेत आले आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे. त्यामुळे नागरिकांना आकर्षित करतील असे उपक्रम आयोजित करत पांडे खासदारकीसाठी तर, फिल्डिंग लावत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज