Pune BJP State Executive Meeting : भारतीय जनता पक्षाच्या कार्य समितीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील पुढाऱ्यांना चांगलेच सुनावले. या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पंकजा मुंडेंना सुनावल्याची चर्चा आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, अनेक नवे कार्यकर्ते समर्पणाने काम करताना पाहायला मिळतात. त्यांचा पक्षाशी फारसा संबंध आला नसेल तेही चांगले काम करत आहेत. कधीकधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळाले नाही एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही, ज्यावेळी आक्रोश करताना दिसतो. त्यावेळी आपण राजकारणात का आलो असा प्रश्न मला पडतो. पुढच्या काळात तुमच्या कामाचे मूल्यमापन होईल. वर्षभरानंतर त्यांनी त्याग केला आहे, त्यांच्याच त्यागाचे मूल्यमापन होईल. ज्यांनी त्याग केला नाही त्यांचा फार उपयोग देखील राहणार नाही, असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंनाही सोडलं नाही…
पुढच्या एक वर्षात कोणाला काही मिळणार नाही. कोणी समिती मागायची नाही, कोणी पद मागायचे नाही. कोणी मंत्रिपद मागायचे नाही. आता ही वेळ आहे की पार्टीने मला काय दिले विचारण्यापेक्षा मी पार्टीला काय देणार? ज्याच्यामध्ये हिम्मत आहे तो मागणार नाही. त्याच्यामध्ये दानत आहे तो मागणार नाही. देणारा तो खरा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे फडणवीस म्हणाले.
नड्डांचे भाषण सुरु अन् मंत्र्यांना झोप आवरेना
व्यासपीठावरील दिग्गजांकडे पाहत फडणवीस म्हणाले, तुम्ही मला सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही मला सांगितले पद सोडा, मी पद सोडायला तयार आहे. तुम्ही मला सांगितलं घर सोडा, मी एक वर्ष घर सोडायला तयार आहे. तुमची त्याग करायची तयारी आहे का सांगा ? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे.