आपण आरोग्य क्षेत्रात खूप मागे आहोत हे आपल्याला कोरोनाच्या संकटात समजलं. या काळात अनेक वैद्यकिय उपकरणे, औषधे दुसऱ्या देशांकडून घ्यावी लागली. त्यानंतर मात्र चांगले काम झाले आणि आपण कोरोनाच्या लसी दुसऱ्या देशांनाही दिल्या. कोरोना काळात आपण चांगले काम केले. पुण्यात फिरते रुग्णालय सुरू केले. आज या रुग्णालयाचा हजारो रुग्ण लाभ घेत आहेत. त्यानंतर आता पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याचीही सोय केली गेली पाहिजे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले.
पुणे वैद्यकीय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्यावतीने बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे उद्घाटन शनिवारी झाले.यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, मी ज्यावेळी फिरते रुग्णालय सुरू करण्याचा विचार सांगितला. त्यावेळी अनेकांना तो पटला नाही. पण शहरातील लोकांचे रोजचे जीवनमान पाहिले तर या रुग्णालयाची गरज होती. त्यानंतर रुग्णालय सुरू केले. आज या रुग्णालयाचा हजारो लोक लाभ घेत आहेत. त्यानंतर आता आणखी एका गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. ती म्हणजे, पुण्यात आरोग्य सुविधा चांगल्या मिळत असल्याने येथे रुग्ण उपचारांसाठी मोठ्या संख्येने येतात. त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईकही असतात.
दिवसभर रुग्णांजवळ दवाखान्यात थांबतात. रात्री मात्र दवाखान्यात थांबू देत नाहीत. त्यामुळे कुठेतरी रहावे लागते. नातेवाईकांचे खूप हाल होतात. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. तेथेही रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होतात. त्यामुळे या लोकांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे. याआधी केईएम हॉस्पिटल परिसरात अशी सोय करण्यात आली आहे, असे पाटील म्हणाले.
देशात आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण सत्ता राखणार? सर्व्हेतून समोर आली नवी माहिती
ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दूरचं कळत. त्यामुळे आपण आधीपासून आरोग्यावर लक्ष देत आलो आहोत. धर्मांतराला प्रतिबंध, आदिवासी भागात सेवा देणे, आरोग्य, अशी सगळी कामे संघाने केली आहेत.