पुणे : अमित शहा पुण्यात येताच, (Pune) ठाकरे (Uddhav thackeray) आणि शिंंदे (Eknath Shinde) समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याती गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर हा प्रकार घडला. हा सगळा हैदोस थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुण्यातील (Pune) गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर आले होते. त्यावेळी ठाकरे समर्थक आणि शिंदे (Eknath Shinde) समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु करण्यात आली. शिंदे समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर ठाकरे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून आले. ठाकरे गटाकडून ठाकरे तर शिंदे गटाकडून शिंदे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे, यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाचे पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिला कार्यकर्ताही आपापसात चागलच भिडले आहेत. यातच परिस्थिती निवळत नसल्याचं पाहत अखेर पोलिसांना मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गावर थांबवलं. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढून त्यांना येथून जाण्यास सांगितलं आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत. काल रात्री पिंपरी-चिंचवड येथे सुद्धा ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी मशाली पेटवत शिंदे अन त्यांच्या गटाच्या नेत्यावर आक्रमक शब्दात घोषणाबाजी केली होती. तर आज पुण्यातही बालगंधर्व येथे ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला दोन्ही गटाला आमंत्रित करण्यात आल्याने ते गांजवे चौकात जमले असता ही घटना घडली. मात्र, पोलीस वेळेवर आल्याने हा वाद निवळला आहे.
दरम्यान, देशाच्या केंद्रीय मंत्री अमित शहा हे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे पुण्यामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. मात्र, अचानक ही घटना घडल्याने पोलिसांची मात्र, चांगलीच पळापळ झाली. या घटनेनंतर पोलीस या संपूर्ण घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.