घरासमोर शांतेतत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना आणि नागरिकांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भोसले चाळ परिसरात हा प्रकार घडला. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मातोश्री वर खलबतं! ठाकरे गटाच्या वाघीण सुषमा अंधारे लोकसभेत नवनीत राणांशी भिडणार?
लोणी काळभोर परिसरातील भोसले चाळ परिसरात अल्पवयीन मुलं शांततेत वाढदिवस करत होते. त्याचवेळी अचानक पोलिस या ठिकाणी आले. त्यानंतर पोलिसांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना मारहाण केली. पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याने अल्पवयीन मुलाच्या पाठीवर वळ उठल्याचं दिसून येत आहे.
पोलिसांनी मारहाणीसोबतच या ठिकाणच्या महिलांनादेखील शिवीगाळ केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात रोष पसरला आहे.
Video : महाराष्ट्रात जातीय दंगली होण्यामागे कोणाचा हात?
अल्पवयीन मुलाचा केक कापण्याचा कार्यक्रम सुरु असतानाच त्या ठिकाणी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षकांसह चार इतर सहकारी पोलिस वाहनातून आले. वाहनातून उतरल्यानंतर कुठलीही विचारपूस न करताच पोलिसांनी केक कापणाऱ्या मुलांसह नागरिकांना काठीने मारहाण करण्यात सुरुवात केलीय.
‘महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला’…; जयंत पाटील थेट बोलले
मारहाण सुरु असतानाच स्थानिक महिलांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिस कोणाचंही ऐकत नव्हते, मुलांना मारहाणच करीत होते, असा आरोप करण्यात आला आहे. काही एक कारण नसताना पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याबाबत संतोष भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
तक्रार अर्जामध्ये पोलिस निरीक्षक गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप कुठलाही गुन्हा दाखल न झाल्याची माहिती समोर आली आहे.