Download App

पुणे हादरलं! स्प्रे मारला, बलात्कार केला अन् सेल्फी काढून डिलिव्हरी बॉयनं ‘पुन्हा येईल’सांगितलं…

  • Written By: Last Updated:

Courier Boy Rape On Girl In Pune Kondhawa Area : डिलिव्हरीच्या नावाखाली नराधमाने 25 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी (Selfi) काढला आणि त्यात परत येईल असा मेसेज लिहिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कोंढवा परिसराती एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार बुधवारी (दि.2) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे. आरोपीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Bacchu Kadu Exclusive : तेव्हा सांगितलं असतं तर, फडणवीस तोंडावर पडले असते…

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरूणी ही मुळची अकोल्याची असून, पुण्यातील एका खासगी कंपनीत ती काम करते. पीडित तरूणी तिच्या भावासोबत कोंढवा परिसरात वास्तव्यास आहे. मात्र, भाऊ गावाला गेल्याने ती घरात एकटीच होती. बुधवारी संध्याकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कुरिअर बॉय असल्याचे सांगत प्रवेश मिळवला. त्यानंतर त्याने पीडितेच्या घराची बेल वाजवत कुरिअर आले असल्याचे सांगितले. त्यावेळी हे पार्सल माझे नाही असे सांगितले. पण त्यानंतरही तुम्हाला सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. त्यामुळे पीडितेने सही करण्यासाठी सेफ्टी डोअर उघडला.

Video : स्वारगेट आगारात रोज बलात्कार; कंडोम अन् दारूच्या बाटल्या दाखवत वसंत मोरेंचं खळ्ळखट्याक

दरवाजा उघडताच आरोपीने संधी साधली

सही करण्यासाठी म्हणून पीडित तरूणीने सेफ्टी डोअर उघडला असता आरोपीने संधी साधली आणि त्याने तरूणीच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या मोबाईलवर सेल्फी काढला आणि ‘मी परत येईल’ असा मेसेजही टाईप करून ठेवला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर, काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिल्याचा मेसेज आरोपीनी पीडितेला दिल्याचे पोलिस उपायुक्त (झोन ५) राजकुमार शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचा चेहरा कैद झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (बलात्काराची शिक्षा), ७७ (दृश्यवाद) आणि ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, पॅनिक अटॅक आलेल्या तरुणीवर इनहेलर देऊन सामूहिक बलात्कार

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भर संध्याकाळी आणि उच्चभ्रू सोसायटीत अत्याचाराची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेसोबतच सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोपीवर दोन घटनांमध्ये ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि खराडी पोलिसांत गुन्हे दाखल असल्याचे समजते. तर, आणखी एका प्रकरणात 19 वर्षीय पीडितेवर आरोपीने ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि काही फोटोही काढल्याचा आरोप आहे.

follow us