‘मी सेल्फी घेण्यास गेलो, पण… नाना पाटेकरांनी डोक्यात मारलेल्या तरुणाची पहिली प्रतिक्रिया

‘मी सेल्फी घेण्यास गेलो, पण… नाना पाटेकरांनी डोक्यात मारलेल्या तरुणाची पहिली प्रतिक्रिया

Nana Patekar Slap Video : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. नाना पाटेकर यांच्या जर्नी सिनेमाचं (Journey Movie) दशाश्वमेध घाट या ठिकाणी शूटींग सुरु आहे. या शूटींग दरम्यान नानांनी एका चाहत्यांच्या डोक्यात जोरात लगावली. यामुळे अनेकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यावर नानांनी त्यामागचं स्पष्टीकरण देखील दिलं. परंतु, आता नानांनी ज्या मुलाला मारलं त्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली.


सध्या सोशल मीडियावर (Social media) नाना पाटेकरांनी मारलेल्या मुलाचा जोरदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाने नेमकं त्यावेळी काय झालं घडलं आहे ते सांगितलं. तसंच नानांनी मागितलेल्या माफीनाम्यावर देखील भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाला हा तरुण?
“मी गंगा नदी या ठिकाणी पोहायला गेलो होतो, त्यावेळी नाना पाटेकर तिथे शुटिंगला आल्याचं मला कळलं. हे ऐकून मला खूपच आनंद झाला होता. माझ्या आवडत्या कलाकारांपैकी ते एक कलाकार आहेत. यामुळे मला त्यांच्याबरोबर एक सेल्फी घ्यायचा होता. त्याठिकाणी असलेल्या गार्ड आणि क्रू मेंबर्सनी मला थांबवायचा प्रयत्न केला. मात्र, मी इतका उत्साहात होतो की मी कोणाचं देखील ऐकलं नाही”, असं हा तरुण यावेळी सांगितल.

पुढे तो म्हणाला की, “मी फोटो काढण्यासाठी नानांच्या जवळ गेलो. परंतु, त्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली ती मला खूपच अपमानास्पद वाटली. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा बोलावलं देखील नाही. मात्र, मी कोणतीही याबद्दल पोलिस तक्रार करणार नाही.

शिवाजी साटम यांची सून मुख्य भूमिकेत; ‘या’ मराठी नाटकातून लवकरच भेटीला

या तरुणाला डोक्यात मारत असतानाच नानांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरला आहे. यावर स्वतः नाना पाटेकरांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही त्यावेळी रिहर्सल करत होतो. दिग्दर्शकांनी मला हा सीन सुरु करण्यासाठी सांगितला होता. यामुळे मी तो सीन सुरु करणार तितक्यात हा मुलगा आला. तो कोण होता मला माहित नव्हतं. तो आमच्याच क्रू चा भाग असल्याचं मला वाटलं. मी त्याला परत बोलावलं पण तो पळून गेला होता. काही गैरसमजामुळे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मला त्याची माफी मागायची आहे, असं म्हणत नाना पाटेकरांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube