शिवाजी साटम यांची सून मुख्य भूमिकेत; ‘या’ मराठी नाटकातून लवकरच भेटीला
Shivaji Satam Daughter in law: मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत एक नावाजलेला चेहरा म्हणून अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam ) यांना कायम ओळखले जात असते. सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ (CID) या कार्यक्रमामुळे ते प्रत्येकांच्या घराघरात पोहोचले आहेत. यामध्ये त्यांनी एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyumna) ही मुख्य साकारली होती. सीआयडीमधील ‘कुछ तो गडबड है’ या फेमस डायलॉग ऐकला तर आज देखील शिवाजी साटम यांचाच चेहरा डोळ्यासमोर येत असतो. परंतु तुम्हाला माहितीये का, अभिनेते शिवाजी साटम यांची सून देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती लवकरच नवरा- बायकोच्या नात्यावर आधारित नवीन नाटक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
शिवाजी साटम यांच्या सूनेचे नाव अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम (Madhura Velankar Satam)आहे. मधुरा आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ (Aapan Yana Pahilt Ka) या नव्याकोऱ्या नाटकामध्ये मधुरा आणि तुषार मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहेत.
ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नवऱ्या- बायकोच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटके दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीने आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करत असतात. आता तुषार दळवी, मधुरा वेलणकर साटम, विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यासारख्या कसलेल्या अनेक दर्जेदार कलाकारांना घेऊन ‘आपण यांना पाहिलेत का?’ या नाटकामध्ये विजय केंकरे मराठी नाट्यप्रेमींना काय नवीन अनुभव देणार याची मोठी उत्सुकता लागली आहे. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी घेतली आहे.
Aapan Yana Pahilt Ka: विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ लवकरच रंगभूमीवर
वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाच्या लेखनाची तयारी आहे. आपल्या सुखी संसाराला कोणाची देखील दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जोडप्याला वाटत असतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत. हे आयुष्यात असं खरच असतं? अश्यातच अचानकपणे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि घरात एक वादळ प्रवेश करत आहे. या वादळाच्या येण्यानं त्या नवरा आणि बायकोच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकाद्वारे आपल्या लवकरच अनुभवास मिळणार आहे.