Download App

सुसंस्कृत पुण्यात धक्कादायक प्रकार; ‘करणी’साठी अघोरी कृत्य; गुन्हा दाखल

Pune Crime : सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख. मात्र, याच शहरात आता करणी, जादूटोण्यासारखे अघोरी प्रकारही घडू लागले आहेत. असाच एक अघोरी कृत्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. करणीकरता जादूटोण्याचे अनिष्ट व अघोरी प्रकार पुण्यातील जनवाडी जनता वसाहत परिसरात घडला आहे. या प्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत सहा जणांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका, नाहीतर.. ऊस निर्यातबंदीवर सदाभाऊंचा संताप

याबाबत आधिक माहिती अशी, फिर्यादी अनिकेत सुपेकर यांच्या नातेवाईकांवर करणी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या आईची साडी चोरून नेऊन फिर्यादीची आई सुनिता सुपेकर, मावशी अनिता चव्हाण, काकू आशा सुपेकरआणि फिर्यादी यांच्या वसाहतीतील कृष्णा चांदणे नावाच्या व्यक्तीचे फोटो ठेवण्यात आले होते. या फोटो व साडीच्या बाजूला अंडी, टाचणी लावलेले लिंबू, भात, मटण, हळद, कुंकू, अगरबत्ती ठेऊन करणी करता जादूटोण्याचे अनिष्ट व अघोरी कृत्य करण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.

Tags

follow us