Download App

‘इथे फक्त आंदेकरच…!’ आयुषवर झाडल्या धडाधड 9 गोळ्या; वडिल पॅरोलवर बाहेर, आज अंत्यसंस्कार

18 वर्षीय आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. हा हल्ला वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यासंबंधी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Written By: Last Updated:

Vanraj Andekar Case Revenge Killed Ayush Komkar : पुण्यातील टोळीयुद्धाने पुन्हा एकदा तणाव निर्माण केला आहे. काही दिवसांपूर्वी 18 वर्षीय आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. हा हल्ला वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यासंबंधी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 5 सप्टेंबर रोजी, गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री सुमारे आठ वाजता, पुण्यातील नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुषवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांची ओळख पटली असून (Pune) त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आयुष आपल्या क्लासवरुन घरी परतत असताना गाडी (Ayush Komkar) पार्क करत असताना या दोघांनी त्याच्यावर (Vanraj Andekar Case)गोळ्या झाडल्या. एकूण 9 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी या मारेकऱ्यांनी धडाधड ओरडत होते की इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच आहेत.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांची ओळख

पोलिसांनी आयुषच्या आई कल्याणी कोमकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. तपासात सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यानंतर पुणे (Pune Crime News) पोलिसांनी आंदेकर आणि कोमकर कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सुमारे 13 जणांचा समावेश आहे. बंडू आंदेकर हा टोळीचा प्रमुख असून, मागील वर्षी वनराज आंदेकर, जो बंडू आंदेकरांचा मुलगा होता, याची हत्या झाली होती.

अंत्यसंस्कार आज होणार 

आयुष कोमकरची हत्या 5 सप्टेंबर रोजी झाली होती, तर दुसऱ्या दिवशी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचे विसर्जन पार पडले. पोलिसांनी तणाव टाळण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयातील शवागारात ठेवला होता. आता सोमवारी, त्याच्या वडिलांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडून, आयुषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

follow us