Download App

पुणे ड्रग्ज प्रकरणी हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस अ‍ॅक्शनमध्ये

Pune Drugs तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात

Image Credit: Letsupp

Pune Drugs Police in Action 5 arrested : मागील अनेक दिवसांपासून पुणे जिल्हा कोणत्या कोणत्या कारणाने चांगलाच चर्चेत आलायं. त्यात आता एका नामंकित हॉटेलमध्ये पार्टीत तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ व्हायरल (Pune Drugs Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे या हॉटेल मालकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचबरोबर हे हॉटेल सील केले जाणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

Parliament Session: संसदेचा पहिला दिवस विरोधक गाजवणार? 10 दिवसांत काय काय होणार?

पुण्यातील एफसी रोड परिसरात एका नामंकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या पार्टीमध्ये काही तरुण बाथरुममध्ये ड्रग्ज घेत आहेत. काही तरुण ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख होती, आता ही ओळख पुसली जात असल्याचं दिसून येत आहे.

Pune Drugs : अधिकाऱ्यांकडून मंत्री शंभूराज देसाईंना हप्ता जातो; आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप

ही घटना घडल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष चरण सिंह राजपूत आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या पाच जणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान पुण्यातील नामंकित हॉटेलसह पबमध्ये तरुण-तरुणी येत असतात. हे तरुण ड्रग्ज घेऊन बाथरुममध्ये जात त्याचं सेवन करीत असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणीनगर परिसरात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने बेधुंद अवस्थेत कार चालवताना तरुण-तरुणीला चिरडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यातील बार आणि हॉटेलांवर कारवाई करण्याची मागणी आग्रहाने केली जात होती. काही पब आणि बार चालकांवर कारवाईदेखील करण्यात आली. मात्र, अद्यापही काही पब रात्री उशिरापर्यंत सुरुच असल्याचं दिसून येत आहे.

follow us

वेब स्टोरीज