पुण्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकानं, हॉटेल कायमची सील होणार; महापालिका आयुक्तांचा कडक इशारा

Pune Encroachment Drive Nawal Kishore Ram: पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

Pune Encroachment Drive Nawal Kishore Ram: पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

Pune Encroachment Drive Nawal Kishore Ram: पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

Pune Encroachment Drive Nawal Kishore Ram: पुणे शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी झालेली अतिक्रमणे हटवण्याची कारवाई वेगाने सुरू आहे. या मोहिमेत अवघ्या एका दिवसात तब्बल 2 लाख स्क्वेअर फुटांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मात्र, अतिक्रमण हटवल्यानंतर काही ठिकाणी पुन्हा त्याच जागांवर अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Nawal Kishore Ram) यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

सोनं खरेदी करू नका, मोदींच्या या आवाहनामुळे जनतेचे पैसे वाचले! सोन्याचे दर 30 हजारांनी घसरल्याचा दावा

आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणेकरांना या मोहिमेत महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांचा सार्वजनिक जागांवरील (Public Space) हक्क हिरावला जातो. रस्ते, फुटपाथ आणि मोकळ्या जागा या सर्व नागरिकांसाठी असतात. मात्र, काही व्यावसायिकांकडून या जागांवर अतिक्रमण करून त्यांचा वापर स्वतःच्या व्यवसायासाठी केला जातो. त्यामुळे सामान्य नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे.

पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकानं, हॉटेल कायमची सील करणार

महापालिकेच्या कारवाईनंतरही काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. एकदा अतिक्रमण हटवल्यानंतर त्याच जागेवर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारे पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांची दुकाने, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापने कायमस्वरूपी सील (बंद) करण्यात येतील. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांविरोधात गुन्हेही दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

खाटू श्यामजींच्या भक्तांवर काळाचा घाला; धुळ्यातील 9 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

शहरातील सार्वजनिक जागा नागरिकांसाठी खुल्या राहाव्यात, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. केवळ अतिक्रमणे हटवून ही समस्या सुटणार नाही, तर हटवलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणेकरांनी महापालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करावे आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण होणार नाही यासाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.

पुण्यात 100 विद्यार्थ्यांना मोफत MBA करण्याची संधी! ऑलकार्गो समूहाची 15 कोटींची गुंतवणूक; लॉजिस्टिक्स स्कूलची स्थापना

महापालिकेच्या या मोहिमेमुळे पुण्यातील सार्वजनिक जागा मोकळ्या होण्यास मदत होणार असली, तरी पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार प्रत्यक्षात किती कठोर कारवाई होते, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version