पुण्यात FDA ची मिठाई विक्रेत्यांवर मोठी कारवाई; 1188 किलो लाडू-बुंदी, तर 303 किलो बर्फीचा साठा नष्ट

Pune FDA Action: तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या 'सेफ फुड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत पुण्यातील दोन मिठाई विक्री केंद्रांवर कारवाई केली.

Tukaram Mundhe Pune FDA Action

Tukaram Mundhe Pune FDA Action

Tukaram Mundhe Pune FDA Action: पुण्यात सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मिठाई विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘सेफ फुड, सेफ महाराष्ट्र’ (Safe Food, Safe Maharashtra) मोहिमेअंतर्गत पुण्यातील दोन मिठाई विक्री आणि उत्पादन केंद्रांवर तपासणी करण्यात आली. यामध्ये 1188 किलो मोतीचूर लाडू आणि बुंदी, तसेच 303 किलो बर्फीचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. या सर्व मिठाईची एकूण किंमत 2 लाख 94 हजार 900 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अहिल्यानगर, सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीत कुणी मारली बाजी? पहा संपूर्ण यादी

कोंढव्यात 1188 किलो लाडू आणि बुंदी जप्त

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील टिळेकर नगरमधील पुखराज नगादराम चौधरी (वय 50 वर्षे) यांच्या मालकीच्या मे. गायत्री लाडू भांडार या दुकान आणि उत्पादन केंद्रावर FDA च्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 1008 किलो मोतीचूर लाडू आणि 180 किलो मोतीचूर बुंदी असा एकूण 1188 किलो साठा आढळला. या मालाची अंदाजे किंमत 1 लाख 73 हजार 700 रुपये आहे.

ब्रेकिंग- सातारा जिल्हा बँक निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरेंना 53 मतं मिळाली; जयकुमार गोरेंकडून त्यांचे बंधू शेखर गोरेंचा पराभव

या मिठाईच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने संपूर्ण साठा जप्त करून नष्ट केला. तसेच संबंधित उत्पादन केंद्राचा अन्न परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी के. व्ही. बारवकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

धानोरीत 303 किलो बर्फीचा साठा नष्ट

दुसरी कारवाई पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धानोरी येथील मे. आर. बिकानेर मिठाई येथे करण्यात आली. 2 नोव्हेंबर 2026 रोजी केलेल्या तपासणीत 303 किलो बर्फीचा साठा आढळला. या बर्फीची किंमत अंदाजे 1 लाख 21 हजार 200 रुपये आहे.

ब्रेकिंग: सांगली जिल्हा बँक निवडणूक; गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी!

तपासणीदरम्यान बर्फी निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच ती खोलीच्या तापमानावर ठेवण्यात आली होती. मिठाईच्या पाकिटांवर आवश्यक लेबल नव्हते आणि खरेदीची बिलेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे नाशवंत असलेला 303 किलो बर्फीचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. याशिवाय कलाकंदाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी एच. आर. मारेवार यांनी ही कारवाई केली. क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त एस. एन. चट्टे आणि सह आयुक्त (अन्न) एस. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

America Iran Conflict : अमेरिका – इराण पुन्हा संघर्ष पेटला; क्यूशम बेटावर अमेरिकेचा हल्ला

मिठाई विक्रेत्यांना FDA चा इशारा

सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी वाढते. अशा वेळी ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी FDA कडून तपासणी मोहीम सुरू आहे. मिठाई विक्रेत्यांनी पदार्थ योग्य तापमानात साठवावेत, पाकिटांवर आवश्यक माहिती द्यावी आणि खरेदीची बिले जतन करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे घटक आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Exit mobile version