Mumbai HC On Pune Dry Day In Ganesh Festival : ”10 दिवस दारू मिळाली नाही तर व्यसनाधीन लोकांमुळे रुग्णालये भरतील…” अशी मिश्किल टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात लागू करण्यात आलेल्या 10 दिवसांच्या दारूबंदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी का? यामागचा तर्क काय? असा सवाल करत न्यायालयाने पुणे प्रशासनाला चांगलंच सुनावलं. या सुनावणीनंतर प्रशासनानेही आपल्या आदेशात बदल करण्याची तयारी दर्शवली असून, आता 10 दिवसांऐवजी केवळ दोन दिवस ड्राय डे ठेवण्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबरपासून 10 दिवस दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश काढला होता. या निर्णयाविरोधात हॉटेल व्यावसायिक आणि मद्यविक्रेत्यांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश एम.सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. Mumbai HC On Pune Dry Day In Ganesh Festival
सुनावणीदरम्यान न्यायालयाने “संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होतो, मग केवळ पुण्यातच अशी बंदी का?” असा सवाल प्रशासनाला केला. केवळ पुण्यातील नागरिकच दारू प्यायल्यानंतर चुकीचं वागतात का, असा सवाल करत न्यायालयाने अशा प्रकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सरकारी वकिलांनी स्पष्टीकरण देताना पूर्ण 10 दिवस ड्राय डे असल्याचं चित्र चुकीचं असल्याचं सांगितलं. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काही दिवस आणि काही वेळांसाठी निर्बंध असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं. त्यानंतर गणेश चतुर्थी आणि विसर्जनाच्या दिवशीच पूर्ण ड्राय डे ठेवण्यात येईल, तर इतर दिवशी वेळेनुसार निर्बंध असतील, अशी माहिती कोर्टाला देण्यात आली.
फक्त पुण्यातच बंदी का?
सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुणे प्रशासनाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होतो. मग केवळ पुण्यातच दारू विक्रीवर 10 दिवसांची बंदी का?” असा सवाल कोर्टाने केला. केवळ पुण्यातील नागरिक दारू प्यायल्यानंतर चुकीचं वागतात का, असा सवाल करत न्यायालयाने अशा प्रकारची पद्धत योग्य नसल्याचं स्पष्ट केलं. “केवळ पुण्यातील लोकांसाठीच असा नियम का?” असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला.
‘10 दिवस दारू नाही तर रुग्णालयं भरतील’
10 दिवसांची पूर्ण दारूबंदी केल्यास त्याचे व्यसनाधीन व्यक्तींवर विपरीत आरोग्य परिणाम होऊ शकतात, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. 10 दिवस दारू मिळाली नाही तर व्यसनाधीन लोकांमुळे रुग्णालये भरतील,” अशी मिश्किल टिप्पणी मुख्य न्यायाधीश एम.सी. त्रिपाठी यांनी केली. याच वेळी न्यायालयाने प्रशासनाला आदेश मागे घेणार की नाही, असा थेट सवाल केला. आदेश मागे घेतला नाही तर न्यायालयाला या प्रकरणात योग्य तो हस्तक्षेप करावा लागेल, असा इशाराही देण्यात आला.
उद्या आदेशात सुधारणा करू
न्यायालयाच्या नाराजीनंतर सरकारी वकिलांनी आदेशात बदल करण्याची तयारी दर्शवली. गणेश चतुर्थी आणि विसर्जनाचा दिवस अशा दोनच दिवशी पूर्ण ड्राय डे ठेवण्यात येईल, तर इतर दिवशी दारू विक्रीच्या वेळांवर निर्बंध असतील, अशी माहिती कोर्टाला देण्यात आली. न्यायालयानेही निर्बंधांच्या वेळेबाबत काही सूचना केल्या. गणेश आगमनानंतर दुकाने सुरू ठेवता येतील, तर विसर्जनाच्या काळात परिस्थितीनुसार निर्बंध ठेवता येतील, असं न्यायालयाने सूचित केलं.
#Breaking: After being pulled up by the Bombay High Court, Pune Collector withdraws its initial 12 day ban on alcohol sale and consumption in the district.
Now a fresh order will be issued wherein only September 14 (First day of Ganesh Festival) & September 25 (Immersion Day)… https://t.co/GjXnb22O9d
— Live Law (@LiveLawIndia) September 11, 2026
