Download App

…तेव्हा चंद्रकांत पाटलांनी हात वर केले, आज त्याच हाताने गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिला पक्षात प्रवेश

  • Written By: Last Updated:

Pune gangster Sharad Mohol’s wife joins BJP : पुण्यात आगामी काही दिवसांत पुण्यात मोठा राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदार संघ रिक्त झाला. बापटांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघात येत्या काही दिवसातं पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणूका (Municipal elections) देखील काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळं पुण्यात भाजपमध्ये मोठे प्रवेश सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बडे नेते शाम देशपांडे यांचा भाजपात (BJP) प्रवेश झाला होता. त्यानंतर आज पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

ऑक्टोबर 2021 मध्ये चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली होती. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला होता. यात स्वाती मोहोळ यांचा देखील सहभाग होता. पुण्यामध्ये या घटनेवरून चांगलाच गदारोळ झाला होता. या गदारोळानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली होती. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. या कार्यक्रमासाठी कुठल्याही पासेस वगैरे नव्हत्या, असं म्हणत त्यांनी आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज आपल्या त्याच हातांनी चंद्रकांत पाटील यांनी स्वाती मोहोळ यांना कमळ सोपवले आहे. दरम्यान, स्वाती मोहोळ यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

Market Committee Election Kada : कडा बाजार समितीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, निवडणूक बिनविरोध 

स्वाती मोहोळ या पुण्यातील कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळ याच्या पत्नी आहेत. शरद मोहोळ याच्या विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी शरद मोहोळविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई सुध्दा केलेली आहे. महत्वाची बाब अशी की, शरद मोहोळ हा दहशतवादी गुंड कातील सिद्दीकी याच्या खुनातील एक आरोपी आहे. कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्याच शरद मोहोळ त्याच्या पत्नीचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपात प्रवश केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नव्याने प्रवेश करणाऱ्यांच्या मनात एक भीती असते की आपल्या पक्षात स्थान मिळेल का ? उचित सन्मान मिळेल का ?, फक्त प्रवेश मिळेपर्यंत मागे लागतील नंतर कोपऱ्यात फेकून देतील मात्र हा पक्ष येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करणारा आहे. स्वाती मोहोळ यांचं कर्तृत्व पाहून पक्ष चांगली जबाबदारी देईल असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Tags

follow us