Download App

Pune Gangwar : हातात पत्र, डोळ्यात पाणी… गणेश कोमकरने लेकाचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला

नानापेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची हत्या करण्यात आली.

  • Written By: Last Updated:

Ganesh Komkar Emotional At Son Ayush Komkar Funeral : नानापेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची हत्या करण्यात आली. आरोपीने केलेल्या या हल्ल्यानंतर आयुषचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता. आज अखेर त्याच्यावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुषचे वडील गणेश कोमकर, पॅरोलवर सुटून मुलाच्या अखेरच्या प्रवासाला सामील झाले.

आय लव्ह यू पप्पा…

वनराज आंदेकर (Vanraj Andekar) हत्या प्रकरणी गणेश कोमकर (Ganesh Komkar) सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र, आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी ते स्वतः उपस्थित राहिला. याप्रसंगी गणेशच्या हातातील एक भेटकार्ड चर्चेचा विषय बनले (Ayush Komkar Funeral) आहे. हे कार्ड नसून आयुषने तुरुंगात वडिलांना पाठवलेले पत्र होते. त्यावर त्याने ‘आय लव्ह यू पप्पा’ असे लिहिले होते. त्यासोबत ‘नवीन ड्रेस पाठवलाय’ असेही लिहिले होते. काही बालपणीचे फोटो चिकटवले होते.

आयुष कोमकर हत्या प्रकरणी सहा जणांना अटक

राष्ट्रवादी माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याचा बदला घेण्यासाठी (Pune Gangwar) हत्या केली होती. काल आयुष कोमकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हत्याप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा दाखल आहे. हे सगळे आरोपी फरार झाले होते. त्यातील सहा जणांना मध्यरात्री पोलिसांनी राज्य बाहेरून अटक केली आहे. बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि आणखी दोघांना (Crime News) अटक करण्यात आलीय. इतर आरोंपीचा शोध सुरु आहे.

बाळ, तुला चॉकलेट घेऊन आलोय…

बाळा, तुला चॉकलेट घेऊन आलोय… असे म्हणत गणेश आपल्या मुलाच्या पार्थिवाला शेवटचा निरोप देताना धाय मोकलून रडत होता. संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. गणेश सतत पोलिसांकडे पाहून विचारत होता, त्याची काहीच चुक नव्हती? माझा मुलगा का मारला? मला पण गोळ्या मारा? अंत्यसंस्काराच्या वेळेस आयुषचे कुटुंबीय, भावंडे आणि नातेवाईक उपस्थित होते. त्याच्या भावाने आणि आईनेही आपला प्रचंड राग व्यक्त केला. एका वैराच्या निष्काळजीपणामुळे आयुष एक निष्पाप बळी ठरला.

 

follow us