पुण्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; थरकाप उडवणारे फोटो पाहा..

बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील गोकुळनगर भागात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला.

Gas Cylinder Blast

Gas Cylinder Blast

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री (Pune News) शहरातील वारजे माळवाडी येथील गोकुळनगर भागात ही घटना घडलीय. येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोघे जण गंभीर जखमी झाले होते. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होणार होत. पण दु्र्दैवाने याआधीच त्यांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर येथे आग लागली होती. यानंतर तातडीने अग्निशमन विभागाची वाहने येथे दाखल झाली. त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली.

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले.

बुधवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. वारजे माळवाडी भागातील गोकुळनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली.

गॅस सिलिंडरचा स्फोट इतका भीषण होता की यामुळे पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले तसेच आतील वस्तू सगळीकडे विखुरल्या गेल्या.

गॅस सिलिंडरचा स्फोट इतका भीषण होता की यामुळे पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले तसेच आतील वस्तू अशा प्रकारे सर्वत्र पडल्या होत्या.

या स्फोटात दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. मोहन चव्हाण आणि सतीश चव्हाण अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेचा तपास वारजे पोलिसांनी सुरू केला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला? यात कुणाची चूक होती याची माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version