पुण्याच्या लेकीने घडवला इतिहास! डायना पुंडोले ठरणार फेरारी रेस करणारी पहिली भारतीय महिला

Diana Pundole या फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये रेसिंग करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय ठरल्या आहेत.

Diana Pandol

Diana Pandol

Pune girl creates history! Diana Pundole will become the first Indian woman to race a Ferrari : पुण्यातील डायना पंडोले या रेसर महिलेने जागतिक स्तरावर इतिहास घडवला आहे. डायना या फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप फेरारी 269 चॅलेंजमध्ये रेसिंग करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय ठरल्या आहेत. विशेष म्हणजे डायना या 32 वर्षांच्या असून त्या दोन मुलांच्या आई आहेत. तर ही स्पर्धा नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत चालणार आहे.

‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला प्रियदर्शिनी इंदलकर-नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

डायना या फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी सज्ज झाल्या आहेत. दरम्यान या अगोदर डायना या स्पर्धेचा भाग म्हणून मध्य-पूर्व राष्ट्रांतील दुबई, अबू धाबी, बहारिन, कतार आणि सौदी अरेबियातील प्रसिद्ध ट्रॅकवर सहभाग घेतील.

शिवानी सुर्वेच्या सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता! ‘या’ दिवशी भेटीला येणार ‘OLC : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’

यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणं हा खरचं अविश्वसनीय सन्मान आहे. या स्पर्धेत भाग घेणारी पहिली महिला भारतीय असणे हा माझ्यासाठीच नाही तर मोटारस्पोर्टमदील महिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम ‘गोंधळ’, भव्य ट्रेलरने उत्सुकता वाढवली

तर डायना यांच्या अगोदरच्या यशाबद्दल सांगायचे झाले तर 2024 मध्ये त्यांनी मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर एमआरएफ सॅलून कार्सचे विजेतेपद पटकावले होते. पुरूष प्रतिस्पर्ध्यांना हरवून त्या रेसिंग चॅम्पियनसीप जिंकल्या होत्या. तेव्हाही त्या पहिल्या महिला भारतीय ठरल्या होत्या.

कितीही गुन्हे दाखल करा, मी सरकारच्या विरोधात बोलत राहणार; रोहित पवारांची पुन्हा आक्रमक भूमिका

डायना यांच्या या करिअरची सुरूवात 2018 झाली आहे. तेव्हा त्यांनी जेके टायर वुमन इन मोटरस्पोर्ट्स कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये प्रगती करत इंडियन टूरिंग कार्स आणि एमआरएफ सॅलून कार्ससारख्या विविध स्पर्धांमध्ये स्थान निर्माण केले आहे.

गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र ?

डायना यांना या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली ती त्यांच्या दिवंगत वडिलांमुळे कारण डायना यांना त्यांच्या वडिलांनी 250 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने रेस करण्यासाठी स्वत: कठोर प्रशिक्षण दिले आहे. तर आता त्या सहभागी होणार असलेल्या फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपसाठी त्यांना फेरारी नवी दिल्लीकडून मोठा पाठिंबा दिला आहे.

 

 

Exit mobile version