पुणे पदवीधरवरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली ! ही जागा आमचीच, आम्हीच लढणार, राष्ट्रवादीने शड्डू ठोकला

Pune Graduates Constituency Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू केलीय.

Ncp BJP

Ncp BJP

Pune Graduates Constituency Election: पुणे पदवीधर मतदारसंघावरून (Pune Graduates Constituency Election) महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) रस्सीखेच सुरू झालीय. एकीकडे भाजपने निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीची आहे. ही जागा आम्हीच लढणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष व माजी आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू केलीय. पुण्याचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत सूचना दिली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे म्हणाले, हा पदवीधर मतदारसंघ पहिल्यापासून राष्ट्रवादीचा आहे. ही जागा आमचीच आहे, आम्ही ही जागा लढविणार आहे.


Sanjay Raut : तुरुंगातले अनुभव, किस्से अन् बरंच काही…’बोध कीर्तन’ पुस्तकातून कोणता गौप्यस्फोट?


भाजपकडून थेट उमेदवार जाहीर

मागील निवडणुकीत येथून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण लाड हे आमदार आहेत. त्यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केलेला आहे. परंतु लाड यांचा मुलगा शरद लाड हे भाजपमध्ये गेलेले आहेत. ते सांगलीचे असून, मागील वर्षीच भाजपने त्यांचा प्रवेश करत त्यांना उमेदवारीचा शब्द दिलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहेत. त्यामुळे या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये झुंपणार आहे.

पृथ्वी शॉचा अवघ्या सहा महिन्यांत साखरपुडा मोडला; होणाऱ्या पत्नीने सोशल मीडियावरच नाते संपविले !


पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात कोणते जिल्हे ?

पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे येतात. भाजपकडून शरद लाड हे इच्छुक आहेत. तर दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि जनसुराज्य पक्षातर्फे अनेक जण इच्छुक आहेत.


जागेसाठी इच्छुकांची गर्दी

या जागेसाठी सर्वच पक्षाकडील इच्छुकांची संख्या आहे. माजी खासदार एस. डी. पाटील यांचे नातू अॅड. धैर्यशील पाटील निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासाठी आमदार जयंत पाटील हे राष्ट्रवादीकडून फिल्डिंग लावून आहेत. ते शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. मंत्री हसन मुश्रीफ यांचे निष्ठावंत समर्थक प्रताप माने हे या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

Exit mobile version