पृथ्वी शॉचा अवघ्या सहा महिन्यांत साखरपुडा मोडला; होणाऱ्या पत्नीने सोशल मीडियावरच नाते संपविले !

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी मार्च 2026 मध्ये साखरपुडा केला होता. त्यावेळी दोघांनी साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Prithvi Shaw

Akriti Agarwal and Prithvi Shaw call off engagement: ‘Our paths are not meant to be together: खेळामध्ये बॅडपॅच सुरू असलेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw ) आयुष्यातही एक मोठे वादळ आले आहेत. या क्रिकेटपटूचा अवघ्या सहा महिन्यांत साखरपुडा मोडला आहे. त्याची होणारे पत्नी आणि सोशल मीडिया आकृती अग्रवाल (Akriti Agarwal) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची ती पोस्ट आहे.

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी 8 मार्च 2026 रोजी साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर काही फोटोही शेअर केले होते. मात्र, आता अवघ्या सहा महिन्यांतच त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला आहे. आकृती अग्रवालने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पृथ्वी शॉसोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले. तिने लिहिले की, अत्यंत दुःखी मनाने मी सांगत आहे की, मी आणि माझ्या प्रियकराने भविष्यातील ध्येयांचा विचार करून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आहे. एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी असतानाही आता आपल्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत, हे दोघांनीही स्वीकारले आहे. सध्याचे विचार करून परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे आकृतीने म्हटले आहे.

आकृतीने पुढे दोघेही आता आपापल्या आयुष्यात पुढे जात असल्याचे सांगितले. तसेच दोघांसाठी सुख आणि शांततेचीच इच्छा आहे. यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करावा आणि या प्रकरणावर कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अंदाज बांधू नयेत, असे आवाहनही तिने केले आहे.

View this post on Instagram

A post shared by AKRITI AGARWAL (@akritiagarwal7)

मार्चमध्ये झाला होता साखरपुडा
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी मार्च 2026 मध्ये साखरपुडा केला होता. त्यावेळी दोघांनी साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्यानंतर जुलैमध्ये आकृतीने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्या पोस्टमध्ये पृथ्वी शॉचा थेट उल्लेख करण्यात आला नव्हता. आता आकृतीने अधिकृतपणे पृथ्वी शॉपासून वेगळे झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, दोघे वेगळे होण्यामागचे नेमके कारण आकृतीने स्पष्ट केलेले नाही.

क्रिकेट कारकिर्दीतही पृथ्वी शॉ संघर्ष करतोय
पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही काळापासून ते भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये आपली कामगिरी सुधारण्याची त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

follow us