Gopichand Padalkar : भाजप (BJP)आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी पुणे (Pune)जिल्ह्यातील इंदापूरमध्ये (Indapur)मराठा समाजाच्या विरोधात भाषण केल्याने मराठा समाज आक्रमक (Maratha society aggressive)झाला आहे. या सभेत गोपीचंद पडळकरांनी ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांचं चांगलंच कौतुक केलं आहे. त्यावरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे.
शेवगावकरांना महिन्यातून फक्त दोनदाच पाणी पुरवठा, लोकप्रतिनिधी मौन बाळगून
इंदापूरमध्ये आज ओबीसी समाजाची एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. आज भाजप आमदार गोपीचंद पडळकरदेखील इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी ओबीसींच्या एल्गार सभेत गोपीचंद पडळकरांनी भाषण केले.
PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ
यावेळी पडळकरांनी केलेल्या भाषणात ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे चांगलेच कौतुकदेखील केले. या एल्गार सभेत आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते.
या एल्गार सभेनंतर आमदार गोपीचंद पडळकर हे इंदापूरमध्येच असलेल्या मराठा आंदोलनस्थळाला भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी आपण या ठिकाणी का आले? असा जाब विचारण्यात आला. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक करण्यात आल्याची चर्चा आहे. ओबीसींच्या एल्गार सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेला सामोरं जावं लागलं.
इंदापूर तहसील कार्यालयासमोर गोपीचंद पडळकर हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. त्याच्याच शेजारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकर्ते बसलेले कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यावेळी पडळकर गो बॅक गो बॅक अशा घोषणा देत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली.
या संपू्र्ण घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आपल्यावर कोणीही चप्पलफेक केली नाही. असे त्यांनी सांगितले आहे. आपण त्या ठिकाणाहून परत आल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय झालं? याच्याबद्दल आपल्याला काही माहित नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.