Download App

Pune ISIS Module Case : एनआयएकडून सहावी अटक, धक्कादायक माहिती उघडकीस…

Pune ISIS Module Case : पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात एनआयएकडून सहावी अटक करण्यात आली आहे. शमिल साकिब नाचन असं या सहाव्या आरोपीचं नाव असून त्याला एनआयएकडून ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचा दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी परदेशातल्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचं उघड झालं आहे. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं.

प्रसिध्द अभिनेत्री जया प्रदा यांना न्यायालयाचा दणका! 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेमकं कारण काय?

आरोपी शमिल साकिब नाचन हा ठाण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीचं प्रशिक्षण आणि चाचणी करत असल्याचं समोर आलं आहे. शमिल नाचन हा जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादिर पठाणसह इतर काही संशयितांच्या सहकार्याने काम करत होता. त्यापैकी इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी, हे ‘सुफा दहशतवादी टोळी’चे सदस्य होते. एनआयएने त्यांना स्फोटकं प्रकरणात ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले होते.

किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, बॉडी बॅग घोटाळ्यातील एफआयआर ईडीने मागवली

एप्रिल २०२२ मध्ये राजस्थानमध्ये शमिलसह ISIS स्लीपर मॉड्यूलचे हे सदस्य पुण्यातील कोंढवा येथील घरात सक्रिय होते. याच ठिकाणी त्यांनी गेल्या वर्षी बॉम्ब प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केली होती. त्यांनी बनवलेल्या बॉम्बची चाचणी घेण्यासाठी स्फोटही घडवून आणला होता. 3 ऑगस्ट 2023 रोजी ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणाच्या NIA ने केलेल्या तपासात असे दिसून आले की, शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याचा आरोपींचा कट होता.

इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान/इस्लामिक स्टेट ऑफ इराक, शाम खोरासान (ISIS-K)), या संघटना भारताविरोधात कृत्य घडवून आणण्यासाठी भारत देशाविरोधात काम करीत आहेत. या दहशतवादी संघटनांंना रोखण्यासाठी एनआयएकडून अधिक तपास केला जात आहे.

Tags

follow us