किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, बॉडी बॅग घोटाळ्यातील एफआयआर ईडीने मागवली

किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, बॉडी बॅग घोटाळ्यातील एफआयआर ईडीने मागवली

Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scams) आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईनंतर आता ईडी देखील त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने त्यांच्यविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांची संपूर्ण यादी ईडीने (ED) मागवली आहे. त्यामुळं आता त्या पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आल्या आहेत. (FIR in body bag scam called by ED increase in Kishori Pednekar’s problem)

5 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. बॉडी बॅग खरेदीत 50 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर आहे. त्यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने कलम 420 आणि कलम 120 ब या कलमांतर्गत पेडणेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. नोंदवलेल्या या गुन्ह्याची माहिती आणि कागदपत्रे आता ईडीने मागवले असल्याची माहिती आहे. त्यामुळेच ईडी किशोरी पेडणेकर यांच्यावरही गुन्हा दाखल करू शकते.

ब्रिटीशकालीन राजद्रोहाचा कायदा हद्दपार; नवीन कायद्यात कोणत्या तरतुदी? 

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेत कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. कोरोनाच्या काळात निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून त्यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास करत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. त्यामुळेच किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होईल, अशी अपेक्षा होती. अशात आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणीत वाढल्या आहेत.

नेमके आरोप काय?
मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यावधींचा घोटाळा केला असा आरोप आहे. कोविड काळात महागड्या किमतीत औषधे खरेदी करून बॉडी बॅग खरेदीत घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला. मृत कोविड पेशंटला वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2 हजारांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने म्हटलं.

दरम्यान, आता ईडीने या प्रकरणातील FIR आणि कागदपत्रे मागल्यानं पेडणेकरांच्या अडचणी वाढल्याचं बोलल्या जातं. त्यामुळं आता ईडी या प्रकरणात पेडणेकरांवर काय कारवाई करते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube