Pune Accident News : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत (Pune Accident) चालली आहे. भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन (Road Accident) अपघात घडत आहेत. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनीसमोर ही घटना घडली. अपघाताच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या घटनेनंतर प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अपघात नेमका कशामुळे घडला याची खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपुरमध्ये भीषण अपघात; हायवानं १० वाहनांना उडवलं, अपघातामध्ये एका तरुणीचा मृत्यू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मोरगावकडे एक स्विफ्ट डिझायर कार निघालेली होती. जेजुरी येथून मोरगावकडे जात असताना एका ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला (क्र. एमएच 42 एएक्स 1060) साहित्य खाली करत असतानाच जोराची धडक झाली. या पिकअपमधून साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात पिकअप टेम्पोतून साहित्य बाहेर काढणारे आणि कारमधील काही प्रवासी अशा एकूण आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या मयतांमध्ये कारमधील चार जणांचा समावेश आहे अशी माहिती पुढे येत आहे.
अपघातातील जखमी लोकांना जेजुरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
जेजुरी मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ एक ढाबा आहे. या ढाब्यासमोर भरधाव वेगात असलेल्या कार आणि पिकअप टेम्पोची धडक झाली. हा टेम्पोतून येथे काहीजण साहित्य खाली उतरवत होते. नेमक्या याचवेळी ही धडक झाली. अपघात इतका भीषण होता की आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
सोमनाथ रामचंद्र वायसे, रामू संजीवन यादव (दोघे रा. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवार वाडी ता. इंदापूर), अश्विनी संतोष येसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर), अक्षय संजय राऊत (रा. झारगडवाडी ता. बारामती) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातातील जखमींची नावे वृत्त लिहिपर्यंत समजू शकली नव्हती.
अहमदाबाद विमान अपघात घटनेत धक्कादायक अपडेट; त्या विमानाचे तीन महिन्यांपूर्वीच…