पुणे: पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील ते रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे.
प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते.
त्यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता कोथळे गाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्यात सहभाग घेतला होता. पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून अनेक योजना त्यांनी राबवल्या. जिल्हा नियोजन समितीचे देखील ते काही काळ सदस्य होते.
ज्येष्ठ पत्रकार, पुणे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश भोईटे यांचे निधन
Prakash Bhoite-प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले.

Prakash Boite