पुणे : कल्याणी नगर भागात (Kalyani Nagar Car Accident) घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची सूत्र हातात घेतली आहे. कोझी आणि ब्लॅक पबवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून येथील दारूच्या (Alcohol) साठ्यासह अन्य साहित्य सील करण्यास सुरूवात करण्यात आली असून, अल्पवयीन मुलांना दारू सर्व्ह केल्याप्रकरणी कोझी अन् ब्लॅक पब सील करण्यातआले आहे. (Pune Kalyani Nagar Car Accident State Excise Department In Action Mode)
Kalyani Nagar Car Accident : कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राऊतांना CP चं थेट चॅलेंज
हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल/ परमिट रूम/पब आस्थापनांचे व्यवहार तात्काळ प्रभावाने माननीय जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशाने बंद करण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने, पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून या मोहिमेत प्रामुख्याने पुढील मुद्यांवर शहरातील पब्स व इतर बार/परमिट रूम्स यांची तपासणी करण्यात येत आहे पुण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी सांगितले आहे.
दोन निष्पाप जीवांचा बळी अन् 15 तासात जामीन
शनिवारी (दि.18) मध्यरात्री भरधाव पोर्शे कारने कल्याणी नगर भागात दोन तरूणांना चिरडले. यात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन तरूणांचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेनंतरही अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून अवघ्या 15 तासात जमीन मंजूर करण्यात आला. एवढेच नव्हे तर, पोलीस स्टेशनमध्येही या तरूणांची विशेष खातीरदारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. या सर्व घटनेनंतर जनसमान्यांकडून प्रशानन आणि एकूणच न्यायव्यवस्थेवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे.
कुणालाही सोडणार नाही
या भीषण अपघातानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाब नसून, कोणालाही सोडले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. घटनेतील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र, आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही सोडणार नसल्याचं कुमार यांनी सांगितले आहे.
Pune Accident News : पोलिसांवर राजकीय दबाव? आमदार सुनिल टिगरेंनी दावा खोडला…
कोर्टाने काय शिक्षा दिली?
पोलिसांना अपघाताची माहिती मिळतात त्यांनी अल्पवयीन आरोपीस कोर्टात हजर केले. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी घडलेली घटना दुर्दैवी असली तरी दाखल कलमात जामीन मिळण्याची तरतूद असल्याचे आधोरेखित केले. त्यानुसार न्यायालयाने ही बाब मान्य करत अल्पवयीन आरोपीस अटीशर्तींसह जामीन मंजूर केला. यात आरोपीला येरवड्याच्या वाहतूक पोलिसात 15 दिवस काम करणे तसेच अपघातावर निबंध लिहण्याबरोबर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचे निर्देश दिले.
Kalyani Nagar Accident : बिल्डर विशाल अग्रवालसह बार मालक, मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात
माझ्याकडे लायसन्स नाही…
आपण कोणत्याही प्रकारचे चालकाचे प्रशिक्षण घेतलं नसून माझ्याकडे चालक परवानाही नाही, याबाबत वडिलांना माहिती आहे, तरीही वडिलांनी पोर्शे कार आपल्याला दिली असल्याचं अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितलं आहे. तसेच मित्रांसोबत रात्रीच्यावेळी पार्टी करण्याचीही परवानगी वडिलांनी दिली असल्याचे घटनेतील अल्पवयीन आरोपीने पोलिसांना चौकशीवेळी सांगितले आहे.