पुणे : पुण्यातील कसबा विधानसभेच्या (Pune Kasba Election) पोटनिवडणुकीत भाजपकडून (BJP ) उमेदवाराचा निर्णय अद्याप नाही. या मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केलेले गिरीश बापट (Girish Bapat) प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले. त्यांच्या स्नुषा स्वरदा यांचं नाव समितीने सुचवलेल्या पाच जणांच्या यादीत नाही. काँग्रेसकडून लढवण्यास नऊ जण इच्छुक आहेत. यामध्ये रवींद्र धंगेकरांचं (Ravindra Dhangekar) नाव आघाडीवर आहे. यामुळे पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक चर्चेचा विषय बनत आहे.
पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा पेठ मतदारसंघात २५ वर्ष प्रतिनिधित्व केलं. यानंतर मुक्ता टिळक या २०१९ मध्ये विजयी झाल्या. मात्र त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेसने निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. यानंतर काँग्रेमध्ये ही निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र धंगेकर यांचं नावं चर्चेत आहेत.
२०१९ साली अरविंद शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. त्यांना ४७ हजार २९६ इतकी मतं पडली होती. तर २०१४ साली काँग्रेसने गिरीश बापट यांच्या विरोधात रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत तेव्हा मनसेत असणारे रवींद्र धंगेकर यांनी देखील नशीब आजमावताना दिसून आले. त्यांना २५ हजार ९९८ इतकी मतं मिळाली होती.