Download App

जावयाची पुण्यात झिंगाट पार्टी; संकटांच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाथाभाऊंसाठी वैऱ्यांची फौज धावली

  • Written By: Last Updated:

Anjali Damani On Pranjal Khewalkar : राजकीय मुत्सद्देगिरी, मुरलेला राजकारणी नाथाभाऊ सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहे. त्यामुळे खडसे आणि वाद हे जणू पर्यायी शब्द झाले आहेत. बाई, बाटलीच्या राजकीय वादळाने खडसेंना (Eknath Khadse) तडाखा दिल्यानंतर आता खडसे त्यांच्या जावयाच्या पार्टीमुळे चर्चेत आले आहेत. या सर्व गोष्टी बघितल्या वाचल्या की, आपसूक तोंडात येतील ते शब्द म्हणजे संकटं जणू नाथाभाऊंच्या पाठीमागं अक्षरक्षः हात धुवून मागे लागली आहेत. पण, एकीकडे चहूबाजूंनी संकटांनी वेढलेल्या खडसेंना त्यांच्या वैऱ्यांची साथ मिळाली आहे. नेमकं खडसेंचे वैरी कोण आणि त्यांनी संकटात सापडलेल्या खडसेंना कशी साथ दिलीय तेच आपण पाहूया…

कौटुंबिक संकटांची मालिका अनेक महिलांशी संबंध या आरोपांपासून ते आता जावई रेव्ह पार्टीत अडकल्याचा प्रकार अशी अनेक झेंगाटं एकनाथ खडसे यांच्या मागे लागली आहेत. मात्र, या संकंटांना कसं समोरे जायचं याचे कसब खडसेंना अंगभूत आहे.

मोठी बातमी! अमेरिका भारतावर २५% कर लादणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा

हनी ट्रॅप ते जावयाच्या रेव्ह पार्टीचा ताप

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी नाशिक येथील हनी ट्रॅपचा गौप्यस्फोट केला. राज्यातील काही मंत्री, वरिष्ठ अधिकारी या हनी ट्रॅपचे खास शिकार झाल्याचा आरोप करण्यात आले. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे नाथाभाऊंनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. नाशिक येथील हनी ट्रॅपचे कनेक्शन गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात पार जामनेर, पहुरपर्यंत येऊन धडकल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप महाजनांनी केला.

हे प्रकरण सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी आणखी एक बॉम्बगोळा पडला आणि खडसेंसमोर नवं संकटं येऊ उभं ठाकलं. खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्यासह दोन महिला आणि पाच पुरुषांना पुण्यातील खराडी या उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. खडसे यांना अडचणीत आणण्यासाठीच हा ट्रॅप लावण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, अशा पद्धतीची कारवाई केली जाईल, ट्रॅप रचला जाईल अशी शक्यता अगोदरपासूनच होती, असे खडसेंनी म्हटलयं.

वाल्मिक कराडचं मुख्य सूत्रधार! सुटका नाही; धनंजय मुंडेंना क्लीन चिट, आमदार धस काय म्हणाले?

संकटात सापडलेल्या खडसेंसाठी वैऱ्यांची बॅटिंग

एकीकडे खडसे संकटात सापडलेले असताना त्यांच्या वैऱ्यांनी मात्र, नाथाभाऊंसाठी समोर येत जोरदार बॅटिंग केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि हॅकर मनिष भंगाळे यांनी खडसेंसोबत मतभेद असले तरी, खडसेंना काही जण राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या दोघांनी केलाय.

रेव्ह पार्टीत अडकलेले खडसेंचे दुसरे जावई प्रांजल खेवलकर कोण आहेत ?

“खडसेंनी मला छळ छळ छळलं म्हणजे गेले कित्येक वर्ष ते मला इतका प्रचंड त्रास देत आहेत. पण जेव्हा ऐकलं की, त्यांच्या जावयावर रेड झाली, तेव्हा नक्कीच एवढं कळलं की, ही काही साधीसुधी रेड नक्कीच नाही. खडसे गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन यांच्याविरुद्ध बोलत आहेत, म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस लावले का? असा प्रश्न अंजली दमानिया उपस्थित केला आहे. तसेच खेवलकर यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर, त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे, पण हे ज्या पद्धतीने झालं आहे ते पाहता हे सर्व मला राजकीय षड्यंत्र असल्याचे दामानियांनी म्हटले आहे.

घरात दारूची पार्टी कायदेशीर? रेव्ह पार्टी म्हणजे काय? वकिलांनी सांगितली व्याख्या अन नियम

दुसरीकडे कधीकाळी पुण्यातील जमीन घोटाळ्यात गाजलेल्या हॅकर मनिष भंगाळे यांनीसुद्धा खडसेंची बाजू उचलून धरली आहे. खेवलकर यांच्या प्रकरणातील ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, त्या माझ्यासमोर आल्या आहेत. त्या बघता हा सर्व ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे भंगाळेंनी म्हटले आहे.

follow us