‘खडसेंना ट्रॅपची भीती, जावयाला आधीच अलर्ट …’ पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी गिरीश महाजनांचा घणाघात

Girish Mahajan Attack On Eknath Khadse : खराडीतील रेव्ह पार्टीवर (Pune Rave Party) पोलिसांनी केलेल्या धाडीनंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती अन् एकनाथ खडसे यांचे जावई (Eknath Khadse) प्रांजल खेवलकर यांचे नाव पुढे आल्यानंतर यावर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खडसेंवर थेट निशाणा साधत काही गंभीर आरोप केले.
गिरीश महाजनांचा घणाघात
खडसेंना ट्रॅपची भीती होती, तर जावयांला आधीच अलर्ट करायचं होतं. स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. खडसेचे जावई प्रांजल खेवलकर पार्टीचे आयोजक होते, अशी माहिती समोर आली आहे. काही झालं की, खडसे दुसऱ्यावर ढकलतात. स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे
हाऊस पार्टी सांगून फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती, असं देखील महाजनांनी म्हटलंय.
मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाले आहेत. एकनाथ खडसे यांनी कालच चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून येतात? असा सवाल उपस्थित केला होता. आज त्यांचे जावई अमली पदार्थांसह रेव्ह पार्टी करताना सापडले आहेत. पोलीस चौकशी करत आहेत. पार्टी सुरू होती. या पार्टीत किती महिला होते आणि किती पळाले, याबाबत मला माहिती नाही. जावई बापूंना त्यांनी अलर्ट केलं पाहिजे होतं. प्रत्येक वेळी आपल्यासोबत षडयंत्र कसं होतं? जावई लहान मुलगा नाही की त्याला रात्री उचलून नेऊन तिथे बसवण्यात आलं, असा देखील टोला त्यांनी लगावला आहे.
सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठा स्फोट! संजय राऊतांचा खळबळजनक दावा, दहा वर्षांत न घडलेलं आता घडणार…
ही हाऊस पार्टी नव्हती. प्रांजल खेवलकर हेच पार्टीचे मुख्य आयोजक होते. ड्रग्स, हुक्का, दारू अशा गोष्टी ज्या फ्लॅटमध्ये आढळल्या, त्या कुणाच्या संमतीने आणि पैशावर झाल्या? याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
खडसे कुटुंबावर निशाणा
पुणे शहर पोलीसांनी रेव्ह पार्टीवर मोठी कारवाई केली आहे. खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा समावेश असून खराडी परीसरात रेव्ह पार्टीवर पोलीसांनी छापा टाकला. मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास कारवाई झाली आहे. मोठ्या प्रमाणात दारु, गांजा आणि हुक्का पोलीसांनी जप्त केलाय. या कारवाईत पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीसांच्या कारवाई दरम्यान तीन महिला पळून गेल्या आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी; एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक
या घटनेनंतर विरोधकांनी खडसे कुटुंबावर निशाणा साधला आहे. कधीच स्वतः जबाबदारी घेत नाहीत. काही घडलं की दुसऱ्यांवर ढकलतात. आता जावयाच्या प्रकरणातही तेच होतंय, अशी घणाघाती टीका विरोधकांकडून केली जात आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात मीम्स आणि प्रतिक्रियांचा पूर आला आहे.