Download App

पुणे लोकसभा : फडणवीसांनी कोणाकोणाला शब्द दिलेत….

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे पुण्यात आता वेगाने वाहू लागले आहेत. त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोज भर पडत आहे. त्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. इच्छुकांनीही आपला जोरा लावला आहे. अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक इच्छुकांचे फ्लेक्सचीही संख्या चौकाचौकात वाढत आहे. या तुलनेत काॅंग्रेसमध्ये निवडणुकीसाठी शांतता असली तरी भाजपमध्ये लगबग प्रकर्षाने दिसून येते. (Pune BJP Loksabha Candidate)

मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस, 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

भाजप हा उमेदवारी देताना अनेक निकष लावत असतो. त्यात सर्व्हे हे मोठे अस्त्र असते. लोकांच्या तोंडी आपले नावा राहावे, यासाठीच इच्छुकांना प्रयत्न करावे लागतात. एकदा पक्षाची उमेदवारी मिळाली की पुण्यात मग भाजपच्या उमेदवाराचा जीव भांड्यात पडतो. मग या सर्व्हेत टाॅपला राहण्यासाठी पुण्यातील इच्छुकांनी जोर लावला आहे. ही सगळी तयारी सुरू असताना बहुतांश इच्छुक एक वाक्य मात्र आवर्जून खासगीत सांगतात. ते वाक्य असतं, मला फडणवीस साहेबांनी तयारी करायला सांगितली आहे.

महाराष्ट्र भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचाच शब्द अंतिम असतो, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे फडणवीस हेच महाराष्ट्रातील लोकसभेचे ४८ उमेदवार ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत फडणवीसांचा ग्रीन सिग्नल म्हणजे जवळपास ९९ टक्के काम  पूर्ण असेच आहे. इच्छुकांनाही हे माहिती असल्याने फडणवीस यांचे नाव ते हमखास घेतात. त्यामुळे समोरचा नेता आणि कार्यकर्ता मग या इच्छुकांची उमेदवारी गंभीरपणे घेतो. सध्या तरी पुणे भाजपमध्ये अनेकजण या निवडणुकीसाठी गंभीरपणे तयारी करत आहेत.

Pune Lok Sabha : रविंद्र धंगेकरांची दिल्लीवारी : काँग्रेसमध्ये चलबिचल, भाजपमध्ये चिंता

त्यातील पहिले नाव म्हणजे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol). पुणे भाजपमध्ये गेल्या पाच-सात वर्षांत अनेक नवीन चेहऱ्यांनी आपला ठसा उमटवला. मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष, पुण्याचे महापौर अशा विविध पदांवर संधी मिळाली. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी आपला विचार व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहे. फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा राम अपने मन में हा कार्यक्रम आयोजित करून मोठी गर्दी जमविली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी शहरभर आपला चेहरा झळकवला. मोहोळ यांचे समर्थक त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्धास्त आहेत. कारण एकच. त्यांच्या म्हणण्यानुसार फडणवीस साहेबांनी तयारी करायला सांगितले आहे.

माजी आमदार आणि पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे गंभीरपणे या स्पर्धेत उतरले आहेत.  भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तीन पक्षांची महायुती आहे. ही आघाडी विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर मुळिक यांची अडचण होऊ शकते. कारण त्यांच्या वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. युती टिकली तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहू शकतो. या शक्यतेने मुळीक हे लोकसभेची उमेदवारी मिळवायचीच, या निग्रहाने उतरले आहेत. त्यांनी पुण्यात बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम घेऊन आपले नाव चर्चेत राहील, याची दक्षता घेतली. महाआरोग्य शिबीर, मॅरेथाॅन भरवून आपला खुंटा बळकट करण्याचा प्यत्न केला. याशिवाय त्यांच्याकडेही एक हुकमाचे वाक्य आहे. ते म्हणजे, मला फडणवीस साहेबांनी तयारी करायला सांगितले आहे…

मिलिंद देवरा, पार्थ पवार, विनोद तावडे ‘राज्यसभेच्या’ शर्यतीत… राणेंना ‘नारळ’ मिळणार?

मोहोळ आणि मुळीक या दोघांनीही धसका घ्यावे, असे तिसरे नाव म्हणजे सुनील देवधर. संघाचे प्रचारक, भाजपचे सचिव म्हणून देश पातळीवर काम करणारे देवधर सध्या पुण्यात ठाण मांडून आहेत. त्यांनीही वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. त्रिपुरासारख्या भाजपची कोणतीच ताकद नसलेल्या राज्यात तेथे पक्षाची सत्ता आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे निवडणुकीची रणनीती कशी आखायची हे त्यांनी चांगले ठावूक आहे. त्यांनीही लता मंगेशकर पारितोषिक सोहळा आयोजित केला. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतला. त्यामुळे ते पण तयारीत कुठे कमी नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचा परिचय ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.  नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. ब्राह्मण उमेदवार निवडायचा झाल्यास देवधर यांचे पारडे ठरू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. त्यांचे एक पेटंट वाक्य ते ऐकवतात. लोकसभेच्या उमेदवारीसाठी मला मोदी-शहा यांचा ग्रीन सिग्नल नसला तरी रेड सिग्नलही नाही, असे ठामपणे  सांगतात.

पुणे भाजपामधील चुरस थांबेना; आता राजेश पांडेही जाकीट चढवून तयार

यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ते म्हणजे माजी प्रवक्ते माधव भांडारी यांची. भाजप विरोधात असताना पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे भांडारी अनेकांना परिचित आहेत. पक्ष सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांना राजकीय संधी मिळाली नाही. त्यांनी अयोध्या या विषयवार एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अयोध्या शहर, रामजन्मभूमी आंदोलन, भाजपची भूमिका यावर त्यांनी लिखाण केले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने ते देखील प्रकाशझोतात आले आहेत. २०२४ मध्ये आपल्याला राजकीय सत्तेत स्थान मिळावे, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. ते गेली काही वर्षे पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे पुणे लोकसभेसारखी संधी त्यांना खुणावते आहे. त्यांनाही उमेदवारीसाठी फडणवीस यांच्या शुभेच्छा हव्या आहेत.

याशिवाय दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांचीही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक झाली नाही. ती झाली असती तर बापट कुटुंबाला उमेदवारी मागणे अधिक सोपे झाले असते. पण आता अनेक इच्छुकांच्या स्पर्धेत त्यांना उतरावे लागले आहे. त्यांनीही फडणवीस यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे. लोकसभेवर संधी मिळाली नाही तर इतर पर्यायही या निमित्ताने ते शोधत आहेत. एकूणच पुण्यात लोकसभेसाठी भाजपमध्ये तगडे इच्छुक उतरले आहेत. या नावांशिवाय इतर कोणाची निवड पक्ष करणार का याचीही उत्सुकता आहे. कारण भाजपचे धक्कातंत्र पक्षातील अनेकांना परिचित आहे. हा धक्का कोणाला बसणार यावर पुण्यातील चौकाचौकत पैजा लावल्या जात आहेत.

follow us

वेब स्टोरीज