Download App

Pune Loksabha : ‘माझं पुण्यावर प्रेम पण, लोकसभा निवडणूक’.. फडणवीसांचं वक्तव्य अन् पिक्चर क्लिअर!

Image Credit: Letsupp

Pune Loksabha : लोकसभा निवडणुकी अगदी जवळ येऊन ठेपल्याने राजकीय (Pune Loksabha) पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या जागेवर कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप निश्चित नसलं तरी दबावाचं राजकारण जोरात सुरू आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. पुण्यावर माझं विशेष प्रेम आहे पण मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक जवळ येत चालल्याने फडणवीस लोकसभा निवडणूक लढणार अशा चर्चा ऐकायला येत असतात. या वक्तव्यानंतर अशा चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे.

पुण्यातील एका खासगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुणे लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, पुण्यावर माझं विशेष प्रेम आहे. पण उद्या लगेच बातम्या येतील की पुण्यातून लढणार. मी आधीच सांगतो की पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार नाही.

Devendra Fadanvis : आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

याआधी फडणवीस यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने प्रयत्न केले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महासंघाच्या अध्यक्षांनी पत्रही लिहिले होते. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळीही आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी लोकसभेबाबत इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते.

तसेच याआधी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य करताना त्यांनी म्हटले होते की मी विधानसभा निवडणूक लढणार आणि ते सुद्धा नागपूरमधून. त्यांच्या या वक्तव्यावरून विधानसभा निवडणूक लढून राज्यातच राहण्याची त्यांची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले होते. आता यानंतर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्यातरी त्यांच्याबाबत काही वेगळी रणनीती आखण्यात आली आहे का याची काहीच माहिती मिळालेली नाही.

Devendra Fadnavis : लोकसभा की विधानसभा? फडणवीसांचं उत्तर अन् पिक्चर क्लिअर!

लोकसभा की विधानसभा निवडणूक 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात जातील तसेच लोकसभा निवडणूकही लढतील. मात्र, फडणवीस यांनी या चर्चांना कधीच दुजोरा दिला नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मी विधानसभेचीच निवडणूक लढणार आणि ती सुद्धा नागपूरमधूनच. दहा वर्षांनंतर देखील मी भाजपमध्येच काम करेल आणि पक्ष सांगेल तिकडं काम करेल.

Tags

follow us

वेब स्टोरीज